Bank Holidays October 2022: ऑक्टोबरमध्ये बँका राहणार 21 दिवस बंद, फटाफट कामे उरकून घ्या
Bank Holidays In October 2022: ऑक्टोबर महिना येतोय. तुम्ही ऑक्टोबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करणार असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑक्टोबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ऑक्टोबरमध्ये एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत.
आरबीआयने सुट्ट्यांची तीन कॅटेगरीमध्ये विभागणी केली
विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक हॉलिडे लिस्ट तीन कॅटेगरीमध्ये दिली आहे. (ऑक्टोबर 2022 मध्ये बँक हॉलिडेज) यामध्ये Negotiable Instruments Act, Real Time Gross Settlement Holiday, आणि Banks Closing of Accounts यांचा समावेश आहे. म्हणजेच, राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या आहेत, ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. ऑक्टोबर महिन्यात बँका (Bank) कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत ते आता जाणून घेऊया...
ऑक्टोबरमध्ये बँक सुट्ट्या
1 ऑक्टोबर - बँकेचे अर्धवार्षिक क्लोजिंग (संपूर्ण देशभर)
2 ऑक्टोबर - रविवार आणि गांधी जयंतीची सुट्टी (देशभर)
३ ऑक्टोबर – महाअष्टमी (दुर्गा पूजा) (अगरतळा, भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा, रांची येथे सुट्टी)
4 ऑक्टोबर – महानवमी (आगरतळा, बंगळुरु, भुवनेश्वर, गुवाहाटी, कोलकाता, चेन्नई, गंगटोक, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, पटना, रांची, शिलाँग, तिरुवनंतपुरम येथे सुट्ट्या असतील)
5 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा (विजय दशमी) (देशभर सुट्टी)
6 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (गंगटोकमध्ये सुट्टी)
7 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दसई) (गंगटोकमध्ये सुट्टी)
8 ऑक्टोबर - दुसरा शनिवार सुट्टी आणि मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस) (भोपाळ, जम्मू, कोची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये सुट्टी)
9 ऑक्टोबर - रविवार
13 ऑक्टोबर - करवा चौथ (शिमला)
14 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगरमध्ये सुट्टी)
16 ऑक्टोबर - रविवार
18 ऑक्टोबर – कटि बिहू (गुवाहाटीमध्ये सुट्टी)
22 ऑक्टोबर - चौथा शनिवार
23 ऑक्टोबर - रविवार
24 ऑक्टोबर – काली पूजा/दिवाळी/नरक चतुर्दशी) (गंगटोक, हैदराबाद आणि इम्फाळ वगळता देशभरात सुट्टी)
25 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजा/दिवाळी/गोवर्धन पूजा (गंगटोक, हैदराबाद, इंफाळ आणि जयपूरमध्ये सुट्टी)
26 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा/विक्रम संवत नववर्षाचा दिवस/दिवाळी (बाली प्रतिपदा)/लक्ष्मी पूजा (अहमदाबाद, बेंगळुरु, डेहराडून (Dehradun), गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, शिमला, श्रीनगर)
27 ऑक्टोबर – चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दिवाळी / निंगोल चक्कुबा (गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनौमध्ये सुट्टी)
30 ऑक्टोबर - रविवार
31 ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन/ छठ पूजा (अहमदाबाद, रांची आणि पाटणा येथे सुट्टी)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.