Hyundai Motors आणणार सर्वात मोठा IPO; LIC चा मोडणार रेकॉर्ड!

Hyundai Motors IPO: दक्षिण कोरियाची कंपनी Hyundai Motor IPO अंतर्गत आपल्या भारतीय युनिटमधील 17.5 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे.
Hyundai Motors IPO
Hyundai Motors IPODainik Gomantak

Hyundai Motors IPO: दक्षिण कोरियाची कंपनी Hyundai Motor IPO अंतर्गत आपल्या भारतीय युनिटमधील 17.5 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. शनिवारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे दाखल केलेल्या ड्राफ्ट पेपरमध्ये असे दिसून आले की, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असू शकतो. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे दाखल केलेल्या माहितीनुसार, Hyundai Motor एकूण 812 दशलक्ष शेअर्सपैंकी 142 दशलक्ष शेअर्स IPO मध्ये विक्रीसाठी आणेल.

एलआयसीचा मोठा रेकॉर्ड मोडणार!

Hyundai Motor च्या IPO चा साइज 25 हजार कोटी रुपयांचा असू शकतो अशी बातमी आहे. याचा अर्थ हा IPO देशातील सर्वात मोठा IO असेल. यापूर्वी, एलआयसीने देशातील सर्वात मोठा आयपीओ आणला होता. ज्याचा आकार 21 हजार कोटी रुपये होता. विशेष म्हणजे, Hyundai IPO अंतर्गत नवीन शेअर्स आणत नाहीये. हा IPO पूर्णपणे OFS आधारित असेल. कंपनी आपल्या स्टेकचा काही भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित भाग इतर गुंतवणूकदारांसाठी ठेवेल.

Hyundai Motors IPO
आधी RBI, आता निवडणुकीनंतर LIC सरकारला करणार मालामाल! जाणून घ्या का देणार 3662 कोटी?

ऑटो कंपनीचा IPO 20 वर्षांनी येणार

विशेष म्हणजे, देशात जवळपास 20 वर्षांनंतर एका ऑटो कंपनीचा IPO शेअर बाजारात येत आहे. यापूर्वी, शेअर बाजारात मारुती सुझुकीचा आयपीओ आला होता. मारुती सुझुकीचा IPO 2023 मध्ये आला होता. दुसरीकडे, या आठवड्याच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Ola Electric ला IPO लाँच करण्यासाठी भांडवली SEBI कडून मंजुरी मिळाली आहे.

Hyundai Motors IPO
LIC गुंतवणूकदारांची होणार चांदी, कंपनीला मिळणार 25,564 कोटी रुपये

पैसा कुठे खर्च होणार?

उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एचएमआयएल भारतातील (India) आपली कॅपेक्स योजना पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर करेल, जे पुढील 10 वर्षांत सुमारे 32,000 कोटी रुपये असेल. कॅपिटलाइन डेटानुसार, दक्षिण कोरियाच्या कार कंपनीच्या भारतीय शाखाकडे सुमारे 17,741 कोटी रुपये रोख होते आणि त्यांनी FY23 मध्ये सुमारे 59,761 कोटी रुपयांच्या महसुलावर सुमारे 4,654 कोटी रुपयांचा करोत्तर नफा (PAT) मिळवला होता. FY21 मध्ये (रु. 1,847 कोटी) घट होऊनही, कंपनीचा PAT FY2018 मध्ये रु. 2,124 कोटींवरुन पाच वर्षांत दुप्पट झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com