Instagram वर एवढे फॉलोअर्स असल्यास होईल घरबसल्या कमाई

आजकाल इंस्टाग्रामचा वापर खुप वाढला आहे.
Instagram
Instagram Dainik Gomantak
Published on
Updated on

आधुनिक युगात सोशल मिडियाचा वापर अधिक वाढत चालला आहे. आजकाल इंस्टाग्रामचा वापर खुप वाढला आहे. लोक याचा वापर केवळ मनोरंजनासाठीच नाही तर पैसे कमवण्यासाठी सुद्धा करत आहेत. इंस्टाग्रामवर रील बनवण्यात जितकी मजा आहे, तितकीच मजा पैसे कमवण्यातही आहे. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही इन्स्टाग्रामवर कसे पैसे कमवू शकता? तुमचे किती फॉलोअर्स असावेत ज्यातून तुम्ही पैसे कमवू शकता? आम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या.

  • इंस्टाग्रामवर पैसे कसे कमवावे

अनेक इंफ्युएंसर्स एफिलिएट मार्केट कमिशनद्वारे पैसे कमवतात. इंस्टाग्राम रील्सबद्दल बोलायचे तर, ही कंपनी आपल्या इंफ्युएंसर्स थेट प्रोत्साहन देखील देते. याला बोनस (Bonuses) म्हणतात. काही मॉनिटाइजेशन फिचर्सबद्दल बोलायचेझाले तर, त्याला बॅज (Badges) देखील म्हणतात.

IG Live मधून पैसे कमवण्यासाठी, निर्मात्यांना किमान 10 हजार फॉलोअर्स असणे आवश्यक आहेत. प्रत्येक फिचर प्रत्येक देशासाठी नाही.काही फिचर केवळ काही देशांपुरती मर्यादित आहेत. युजर्सचे वय किमान 18 वर्षे असावे. तसेच, पैसे कमविण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांचे Instagram अकाउंट बिजनेस म्हणून रजिस्टर करावे लागेल.

Instagram
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरात किरकोळ घट; जाणून घ्या आजचे दर...
Instagram
InstagramDainik Gomantak

Instagram आता क्रिएटर्संना पैसे कमविण्याच्या अधिक संधी देत ​​आहे. लोकांनी ते फुलटाइम इनकमचे साधन बनवले आहे. तर बरेच लोक या मार्गाचा वापर करत आहेत. इंस्टाग्रामवर पैसे कमवण्यासाठी लोकांना हजारो फॉलोअर्सची गरज असते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

जगभरातील अनेक ब्रँड नॅनो आणि मायक्रो इन्फ्लुएंसर्ससह काम करतात. हे ब्रँड या इफ्युएंसर्स हायर करतात. हे छोटे इफ्युएंसर्स खूप वाढ दाखवत आहेत आणि युजर्स टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. या ब्रँड्ससोबत काम करून हे लोक हजारो रुपये कमवू शकतात. याशिवाय, इन्स्टाग्रामवर पैसे कमवण्याचा सर्वोत्तम मार्ग संलग्न लिंक्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com