Hinglish, 10 keyboards and much more... iPhone 15 a wealth of features for Indian Customers:
Apple साठी भारत ही स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही वर्षांत भारतात Apple उपकरणांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे.
आयफोनच्या विक्रीच्या वाढीच्या बाबतीत भारत अव्वल बाजारपेठ बनला आहे. याच कारणामुळे Apple ने भारतीयांसाठी iPhone 15 मध्ये एक सरप्राईज गिफ्ट ठेवले आहे.
iPhonr 15 मध्ये भारतातील ग्राहकांसाठी काही विशिष्ट फीचर्स दिली जाणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे की, असे मानले जाते की iPhone 15 मध्ये Apple iOS 17 अपडेट दिले जाणार आहे. ज्यामध्ये खास भारतीय ग्राहक आणि iPhone 15 साठी काही फीचर्स असणार आहेत.
Apple आपला नवा फोन iPhone 15 पुढील महिन्यात म्हणजेच १२ सप्टेंबर २०२३ ला लॉन्च करत आहे.
iPhone 15 मध्ये अनेक नवीन फीचर्स असणार आहेत. यासाठी कंपनीने भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवत ही फीचर्स दिली आहेत.
iPhone 15 मध्ये Siri दोन भाषांना सपोर्ट करेल. यामध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर करता येणार आहे. याचा अर्थ तुम्ही इंग्रजी आणि हिंदीचे मिश्रण करून Siri शी संवाद साधू शकाल.
आतापर्यंत सिरीला हिंदी समजत नव्हते. तसेच यूजर्स इंग्रजी भाषा तेलुगू, पंजाबी, कन्नड किंवा मराठीसह एकत्र करू शकतात.
iOS 17 मुळे iPhone 15 मध्ये यूजर्सना तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम सारख्या भाषांसाठी कीबोर्ड मिळणार आहेत. अशाप्रकारे, 10 भारतीय भाषांचे कीबोर्ड iPhone 15 मध्ये उपलब्ध होतील. यापूर्वी iOS 16.4 मध्ये उर्दू, पंजाबी आणि गुजराती कीबोर्ड दिले होते.
iOS 17 मध्ये, यूजर्स त्यांच्या प्रायमरी आणि सेकेंडरी सिमनुसार मेसेज पाहू शकतील. तसेच यूजर्स प्रत्येक सिमसाठी वेगवेगळी रिंगटोन सेट करू शकतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.