आज Share Market उघडण्याआधी जाणून घ्या काही सोप्या गोष्टी

मार्केटमध्ये आज काही प्रमाणात चढ-उतार दिसून येईल.
share market
share marketdainikgomantak
Published on
Updated on

SGX निफ्टीवरील (Nifty) ट्रेंड 27 अंकांच्या वाढीसह भारतातील व्यापक निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवत असल्याने भारतीय शेअर बाजाराला (Share Market) आज ग्रीन सिग्नल मिळणे अपेक्षित आहे. BSE सेन्सेक्स (Sensex) 1,172 अंक किंवा दोन टक्क्यांनी घसरून 57,167 वर आला तर निफ्टी50 302 अंकांनी किंवा 1.73 टक्क्यांनी 17,174 वर घसरला. (Here are some simple things to know before opening Share Market today)

पिव्होट चार्ट्सनुसार, निफ्टीची प्रमुख सपोर्ट पातळी 17,082 आणि त्यानंतर 16,990 आहे. जर निर्देशांक वर सरकले तर, 17,252 आणि 17,330 या प्रमुख प्रतिकार पातळींवर लक्ष ठेवावे लागेल. आज चलन आणि इक्विटी मार्केटमध्ये काय होते हे जाणून घेण्यासाठी शेअर मार्केटच्या संपर्कात रहा.

share market
EDच्या कारवाईत Amway ची 757 कोटींची संपत्ती जप्त, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

18 एप्रिल रोजी, तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील मोठ्या विक्रीमुळे बेंचमार्क निर्देशांक जवळपास 2 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. कालच्या व्यवहारात सलग चौथ्या दिवशी बाजार घसरला. इन्फोसिस आणि HDFC बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत Q4 निकालांनी गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का दिला. याशिवाय युक्रेनचे युद्ध, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री, अमेरिकन डॉलरचा निर्देशांक 100 च्या वर जाणे ही इतर काही कारणे होती, ज्यामुळे बाजारात विक्री दिसून आली.

share market
जुगाड न करता वीज बिल येईल कमी, फक्त हे काम करावं लागेलं

व्यवहाराच्या शेवटी, काल सेन्सेक्स 2.01 टक्‍क्‍यांनी किंवा 1,172.19 अंकांनी घसरून 57,166.74 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 302 अंकांच्या किंवा 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 17,173.70 वर बंद झाला. निफ्टीने काल डेली चार्टवर डोजी कॅंडल तयार केला. आहे. ज्यामुळे मार्केटमध्ये आज काही प्रमाणात चढ-उतार दिसून येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com