Amway Marketing Scam : अंमलबजावणी संचालनालयाने अॅमवे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे 757 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता तात्पुरती ताब्यात घेतली आहे. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, अॅमवे डायरेक्ट सेलिंग मल्टी-लेव्हल मार्केटिंग नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फसवणूक करत आहे. ज्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की केवळ सदस्यांनाच पुढे सदस्य बनवावे लागेल आणि कंपनीचा माल त्यांना विकावा लागेल. तर कंपनीकडून देण्यात येणारा माल स्थानिक बाजारात अत्यंत कमी किमतीत मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. (Amway's assets worth Rs 757 crore seized in ED operation, find out the whole case)
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, Amway ही एक मार्केटिंग कंपनी आहे ज्याचा संपूर्ण व्यवसाय हजारो कोटी रुपयांचा आहे. विशेष म्हणजे एजंट्सना या कंपनीत सहभागी होण्यास सांगितले जाते. यानंतर त्याला कंपनीकडून विकला जाणारा माल घेण्यास सांगितले जाते. जर तो अधिक सभासद बनवेल आणि त्या सदस्यांनी अधिक सभासद झाल्यावर वस्तू खरेदी केल्या तर त्याला त्याचे कमिशन मिळेल, असे सांगितले जाते. म्हणजेच, प्रथम, जो व्यक्ती या कंपनीचा सदस्य होईल त्याला कंपनीकडून विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी कराव्या लागतील.
यानंतर कमीशनच्या लोभापोटी सदस्य आपल्या जाणकार लोकांना सदस्य बनवत राहतात आणि कमीशनच्या लालसेपोटी ही साखळी पुढे पसरत राहते. या प्रकारात ही कंपनी पिरॅमिड फसवणूक करत होती, असा ईडीचा दावा आहे.
कंपनी लोकांना त्यांच्या फावल्या वेळेत घरातील वस्तू विकून करोडपती होण्याचे आमिष दाखवते, असा आरोप आहे. याअंतर्गत, पिरॅमिडची एकच साखळी तयार केली जाते, ज्यामध्ये साखळीत येणाऱ्या सर्व लोकांना कंपनी त्यांच्या स्वत: च्या किंमतीला वस्तू विकते. ED ने अधिकृतपणे सांगितले आहे की, नामांकित उत्पादकांच्या तुलनेत कंपनीने ऑफर केलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किमती कमालीच्या आहेत. वास्तविक वस्तुस्थिती जाणून न घेता सामान्य भोळसट लोकांना कंपनीमध्ये सदस्य म्हणून सामील होण्याचा मोह होतो आणि ते लोक उत्पादने अवाजवी किमतीत खरेदी करतात आणि त्यामुळे त्यांचे कष्टाचे पैसे गमावतात.
अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात 757 कोटी 77 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये Amway ची जमीन आणि कारखाना इमारत, प्लांट आणि मशिनरी वाहने, तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील बँक खाती आणि मुदत ठेवींचा समावेश आहे. ईडीने अॅमवेच्या वेगवेगळ्या 36 बँक खात्यांमधून 411 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती.
ईडीचा आरोप आहे की त्यांचे संचालक मेगा कॉन्फरन्स आयोजित करत आहेत आणि त्यांची भव्य जीवनशैली दाखवत आहेत आणि भोळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा (Social Media) वापर करत आहेत. ईडीचा असा विश्वास आहे की मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत केलेल्या तपासादरम्यान कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार आढळून आला आहे, ज्यामुळे 757 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.