HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 जुलैपासून होणार बँकेचे विलीनीकरण

HDFC-HDFC Bank Merger: HDFC आणि HDFC बँक विलीनीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
HDFC Bank
HDFC Bank Dainik Gomantak
Published on
Updated on

HDFC-HDFC Bank Merger: HDFC आणि HDFC बँक विलीनीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 1 जुलै 2023 रोजी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे विलीनीकरण होणार आहे.

त्यानंतर शेअर बाजारातील एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्सचे व्यवहार थांबतील. 1 जुलैपासून, HDFC Ltd आणि HDFC बँक या दोन्हींचे विलीनीकरण केले जाईल. यानंतर दोन्ही कंपन्या बाजारात एकत्र व्यवसाय करतील.

30 जून रोजी बोर्डाची बैठक होणार आहे

दरम्यान, 30 दिवसांनी म्हणजे 3 दिवसांनंतर, HDFC आणि HDFC बँकेची (HDFC Bank) बोर्ड बैठक होईल, ज्यामध्ये विलीनीकरणाचा निर्णय घेतला जाईल. त्यासोबतच पुढील माहिती दिली जाईल. विलीनीकरणानंतर एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्सचे व्यवहार 13 जुलैपासून बाजारात थांबतील.

HDFC Bank
RBI Imposes Penalty: HDFC आणि HSBC नंतर RBI ने 'या' बँकाना ठोठावला दंड, तुमचे खाते त्यात आहे का?

ग्राहकांना अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे

दुसरीकडे, दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांना अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. एचडीएफसी सध्या एचडीएफसी बँकेपेक्षा मुदत ठेवींवर (एफडी) अधिक व्याजाचा लाभ देत आहे, ज्यांचे या बँकेत खाते आहे त्यांना त्याचे नवीन नियम माहित असणे आवश्यक आहे.

याचा फटका करोडो ग्राहकांना बसणार आहे

तसेच, या विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांच्या खातेदारांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत. याच्या मदतीने तुम्ही बँकिंग आणि फायनान्सचा एकत्रित फायदा घेऊ शकाल. एचडीएफसी बँकेच्या शाखेतच ग्राहकांना (Customers) एचडीएफसी प्रोडक्ट आणि सेवांचा लाभ मिळेल. या विलीनीकरणामुळे एचडीएफसीकडून कर्ज घेणाऱ्या कोट्यवधी बँक खातेदार, कर्जदारांवरही याचा परिणाम होईल.

HDFC Bank
HDFC Bank चा ग्राहकांना मोठा झटका, आता 'या' कामासाठी मोजावे लागणार अधिक पैसे!

विलीनीकरणाची घोषणा वर्षभरापूर्वी झाली होती

एचडीएफसी बँकेचे एचडीएफसी लिमिटेडसोबत विलीनीकरण सुमारे एक वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आले होते. 40 अब्ज डॉलर्सच्या या विलीनीकरणाला भारतीय कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठा करार म्हणून वर्णन केले जात आहे. कंपनीने सांगितले आहे की, एचडीएफसी बँक एचडीएफसीच्या 25 शेअर्ससाठी 42 नवीन शेअर्स वितरित करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com