HDFC Merger: मोठी बातमी! एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे शनिवारी होणार विलीनीकरण

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी विलीनीकरण होणार आहे.
HDFC Merger
HDFC MergerDainik Gomantak
Published on
Updated on

HDFC And HDFC Bank Merger: एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी विलीनीकरण होणार आहे. एचडीएफसी बँकेने मालकी ताब्यात घेतल्याने समूह कंपन्यांमधील समन्वय अधिक दृढ होईल असा विश्वास एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

मूळ कंपनी एचडीएफसी लिमिटेड (HDFC LTD) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) यांचे विलीनीकरण शनिवारपासून होण्याची शक्यता आहे.

एचडीएफसी बँकेच्या मुख्य प्रवाहात आता गृहकर्जाचाही समावेश असेल. HDFC बँक गृहकर्ज ग्राहकांना मालमत्ता आणि दायित्व उत्पादने विकण्याच्या शक्यतेबद्दल उत्साहित आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका क्लिकद्वारे याची विक्री केली जाऊ शकते. असे पारेख म्हणाले आहेत.

एचडीएफसी बँकेच्या विस्तीर्ण वितरण नेटवर्कचा गृहकर्ज आणि समूह कंपन्यांसाठी चांगल्या प्रकारे उपयोग केला जाईल. भविष्यात काय होईल हे येणारा काळच सांगेल, पण आजच्या घडीला सर्वात मोठी जोखीम संस्थांना कायम ठेवण्याची आहे. यासोबतच भूतकाळात केलेले चांगले काम भविष्यातही कायम राहील, असा विश्वासही कायम ठेवावा लागेल. असेही पारेख म्हणाले.

HDFC Merger
चार कोटींच्या विमा रकमेसाठी मित्राची हत्या; अपघताचा केला बनाव, केस दाखल झाली अन् सर्व प्रकार आला समोर

'भविष्यासाठी आशा आणि अपेक्षा घेऊन निवृत्त होण्याची वेळ आली आहे. एचडीएफसीच्या भागधारकांशी हा माझा शेवटचा संवाद असला तरी, खात्री बाळगा की आम्ही आता विकास आणि समृद्धीच्या अत्यंत रोमांचक भविष्याकडे वाटचाल करत आहोत.'

दरम्यान, पारेख यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला 30 जून हा त्यांच्या बँकेत 46 वर्षे काम केल्यानंतर कामाचा शेवटचा दिवस असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com