Small Savings Schemes: PPF-सुकन्या समृद्धीबाबत मोठी अपडेट, अर्थ मंत्रालयाच्या अल्टिमेटमकडे दुर्लक्ष केल्यास...

Public Provident Fund: तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
FM Nirmala Sitharaman
FM Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

Public Provident Fund: तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अलीकडेच, PPF, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) चे नियम अर्थ मंत्रालयाने बदलले आहेत.

नव्या नियमाबाबत अर्थ मंत्रालयाला आधीच अलर्ट करण्यात आले आहे. या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार आणि पॅन आवश्यक असल्याचे सरकारने अधिसूचना जारी केली होती.

गुंतवणूकदारांसाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा अवधी

दरम्यान, यासाठी अर्थमंत्रालयाने गुंतवणूकदारांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. जर तुम्ही अर्थ मंत्रालयाच्या अल्टिमेटमकडे दुर्लक्ष केले तर तुमचे खाते 1 ऑक्टोबरपासून फ्रीज होईल.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, PPF, सुकन्या समृद्धी योजना (SSY), पोस्ट ऑफिस योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासारख्या सर्व प्रकारच्या लहान बचत योजनांसाठी गुंतवणूकदारांना (Investors) केवायसीसाठी पॅन आणि आधार लिंक करावे लागेल. ते आवश्यक आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या नियमानुसार आधारशिवायही गुंतवणूक करता येत होती.

FM Nirmala Sitharaman
Small Savings Scheme Interest Rates: पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनेसंबंधी सरकार लवकरच देणार खूशखबर; अर्थमंत्री करणार घोषणा!

सुकन्या समृद्धी योजना 2015 मध्ये सुरु झाली

तुम्ही अजून तुमचे आधार तयार केले नसेल, तर तुम्ही तुमच्या आधार नोंदणी क्रमांकाद्वारे देखील गुंतवणूक करु शकता. एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणुकीवर पॅन कार्ड देणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद केले आहे.

मोदी सरकारने 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. सरकारी अधिसूचनेपूर्वी या योजनेत आधारशिवाय गुंतवणूक करता येत होती. मात्र आता हा नियम बदलण्यात आला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले होते की, सुकन्या समृद्धी सारख्या योजनेत खाते उघडताना पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 जमा करावा लागतो. जर तुम्ही त्यावेळी पॅन सबमिट करु शकत नसाल तर तुम्ही दोन महिन्यांत ते सबमिट करु शकता.

FM Nirmala Sitharaman
Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी-पीपीएफचे सरकारने बदलले नियम, अर्थमंत्र्यांचा आदेश जारी

कोणत्या योजनांसाठी नियम लागू आहे?

- पोस्ट ऑफिस मुदत ठेव (FD)

- पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)

- पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS)

- सुकन्या समृद्धी योजना (SSY)

- पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD)

- महिला सन्मान बचत प्रमाणपत्रे

- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

- ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

- किसान विकास पत्र (KVP)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com