Ladali Yojana: केंद्र सरकारकडून मुलींना 5000 ते 11000 पर्यंत आर्थिक मदत

केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असते.
Ladali Yojana
Ladali YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे अनेक खास योजना चालवल्या जातात. सरकारकडून मुलींना पूर्ण 11000 रुपयांची मदत होणार आहे. यामुळे देशातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळणार आहे.

* लाडली योजना (Ladali Yojana)

दिल्ली सरकार लाडली योजनेद्वारे (Ladali Yojana) मुलींना 5000 ते 11000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत होणार आहे. सरकारने 2008 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करू शकता.

* 1100 रुपयापर्यंतची आर्थिक मदत

या सरकारी योजनेअंतर्गत 5000 ते 11000 रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मुलींचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) शून्य शिल्लक खाते असणे बंधनकारक आहे. या योजनेत, जर मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर 18 वर्षांची असेल, तर ती मॅच्युरिटी रकमेवर दावा करू शकते.

Ladali Yojana
PGIM India ने सुरू केली 'ही' स्किम,करा गुंतवणूक आणि वाचवा 46,800 रुपये कर

* या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते

* दिल्लीतील स्थायी रहिवासी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

* मुलीचा जन्म दिल्लीचा असावा.

* मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 100000 किंवा त्यापेक्षा कमी असावे.

* एका कुटुंबातील फक्त 2 मुलीच लाभ घेऊ शकतात.

* या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यकता

मुलीच्या पालकांचे आधार कार्ड आवश्यक आहे. याशिवाय उत्पन्नाचा दाखला, मुलीचा जन्म दाखला, मुलीसोबतच्या पालकांचा फोटो, मागील 3 वर्षांचा रहिवाशी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो जातीचा दाखला, बँक खात्याचे पासबूक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे.

* अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर http://www.wcddel.in/index.html जावे लागेल. नंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल. होम पेजवर तुम्हाला दिल्ली लाडली योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्हाला दिल्ली लाडली योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. तुम्हाला येथे अर्ज डाउनलोड करावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com