सणासुदीच्या मुहूर्तावर सामन्य नागरिकांना सरकारने दिली गूड न्यूज

बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे (Festival Loan)
Government announce festival loans
Government announce festival loans Dainik Gomantak
Published on
Updated on

अर्थव्यवस्थेला (Indian Economy) पुनर्प्राप्तीच्या दिशेने गती देण्यासाठी सरकार सणासुदीच्या (Indian Festivals) काळात कर्जाचे ( Festival Loan) जोरदार वितरण करणार आहे. ऑक्टोबरपासून प्रत्येक जिल्ह्यात कर्ज वाटपाचा (Government Loan) विशेष कार्यक्रम चालवला जाईल. जेणेकरून प्रत्येक क्षेत्रातील इच्छुक लोकांना सहज कर्ज मिळू शकेल. सरकार मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स च्या माध्यमातून देशाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत कर्जाची सुविधा पुरवणार आहे.(Government announce festival loans)

पुढील 45 दिवसात, MFI च्या मदतीने, बँक किंवा वित्तीय संस्था नसलेल्या गावांमध्ये आणि दुर्गम भागात कर्ज सुविधा सुरू केली जाईल. कोरोना कर्ज धोरणाअंतर्गत आरबीआयकडून देण्यात येणारी वैयक्तिक कर्जे आणि आरोग्य पायाभूत कर्जे त्वरीत देण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत.

Government announce festival loans
Big Bull यांनी या मोठ्या बँकेचे 2.88 कोटी शेअर्स केले खरेदी

बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी सांगितले की, ऑक्टोबरपासून सर्व बँका जिल्हा स्तरावरील लोकांशी संपर्क साधून कर्ज वाटप वाढवतील.तसेच अर्थव्यवस्था सावरत असून बँकांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सर्व क्षेत्रांना कर्ज देण्यास सांगण्यात आले असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे .

सणासुदीच्या काळात कर्जाची मागणी वाढेल असे सांगत ऑक्टोबर 2019 पासून या वर्षी मार्च पर्यंत 4.59 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले गेले आहे. रिटेल आणि एमएसएमई क्षेत्रांचा यामध्ये मोठा वाटा आहे. या वर्षी NBFCs आणि MFI च्या माध्यमातून 1.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे असे निर्मला सीतारामन यांनी स्पस्ष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com