तुम्हीही Gmail वापरतायं? १ डिसेंबरपासून अशा युजर्सचं अकाउंट गुगल करणार बंद

Google Gmail Accounts: लवकरच Gmail सह इतर अकाउंट्स Google द्वारे हटविली जाऊ शकतात. तुम्हाला तुमचे अकाऊंट सुरक्षित ठेवायचे असले तर त्यापूर्वी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
Google Will Delete Such Gmail Accounts Which Are Out Of Use For Two Years From December 1.
Google Will Delete Such Gmail Accounts Which Are Out Of Use For Two Years From December 1.Dainik Gomantak.

Google Will Delete Such Gmail Accounts Which Are Out Of Use For Two Years From December 1:

आजच्या काळात गुगल अकाउंट असणे प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म वापरायचा असेल किंवा सोशल मीडियाचा कोणताही प्लॅटफॉर्म वापरायचा असेल, त्यासाठी गुगल अकाउंट किंवा जीमेल असणे बंधनकारक आहे.

सध्या फोनचा वापर करण्यासाठीही गुगल अकाउंट आवश्यक आहे. परंतु असे काही यूजर्स आहेत ज्यांनी त्यांचे Google अकाउंट तर आहे पण ते त्याचा वापरच करत नाहीयेत.

सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुमचे Google अकाउंट बऱ्याच काळापासून वापरले नसेल, तर तुमचे खाते 1 डिसेंबरला कंपीनी कायमस्वरुपी डिलीट करणार आहे.

गुगलने नुकतेच अब्जावधी यूजर्सची Gmail अकाउंट्स कायमस्वरुपी डिलीट केली आहेत. या दरम्यान, कंपनीने सांगितले की त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून वापरात नसलेले अकाउंट्स डिलीट करण्यास सुरुवात केली आहे.

गुगलच्या म्हणण्यानुसार, वापरात नसेलेले अकाउंट तसेच त्यात असलेला सर्व डेटा 1 डिसेंबरपासून डिलीट करण्यास सुरुवात होणार आहे.

Google Will Delete Such Gmail Accounts Which Are Out Of Use For Two Years From December 1.
Mahindra च्या कारमालकांसाठी महत्त्वाची बातमी! एक लाखांहून अधिक XUV कंपनीने परत मागवल्या, हे आहे कारण...

गुगलकडून कोणत्याही अकाउंटवर कारवाई करण्यापूर्वी, यूजर्सना ईमेलद्वारे किंवा मेसेद्वारे आठवण करुन दिली जाईल.

जर तुमचे Google अकाउंट हटवले जाणार असेल, तर त्यापूर्वी कंपनीकडून तुम्हाला एक स्मरणपत्र नक्की पाठवले जाईल.

Google Will Delete Such Gmail Accounts Which Are Out Of Use For Two Years From December 1.
Success Story: हसण्या खेळण्याच्या वयात उभारली 100 कोटींची कंपनी; मुंबईच्या तिलकची महिन्याला करोडोंची कमाई

कारवाई टाळण्यासाठी काय करायचे?

  • दर दोन वर्षांनी किमान एकदा अकाउंट साइन इन करणे आवश्यक आहे.

  • अकाउंट सक्रिय ठेवण्यासाठी ईमेल वापरा.

  • Google Drive सुरु असल्याची खात्री करा.

  • गुगल अकाउंट लिंक असलेल्या यूट्युबवरून व्हिडीओ पाहा.

  • अॅप वेळोवेळी अपडेट करा.

  • गुगल सर्च वापरा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com