
Dangerous Stunt Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि 'रील्स' व्हायरल करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. परंतु, काही वेळा ही 'क्रिएटिव्हिटी' धोकादायक स्टंटबाजीचे स्वरुप धारण करते, ज्यामुळे केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Soial Media) व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन तरुण रील्स बनवण्यासाठी भर रस्त्यात धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एक तरुण दुचाकी चालवत आहे आणि त्याच्या मागे दुसरा तरुण बसलेला आहे. पक्क्या रस्त्यावर दुचाकी वेगात असताना, मागचा तरुण जाणूनबुजून धूळ उडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सामान्यतः कच्च्या किंवा धुळीच्या रस्त्यावर वेगात बाइक चालवल्याने धूळ उडते. पण या व्हिडिओमध्ये पक्क्या रस्त्यावर कृत्रिमरित्या धूळ उडवून तो कच्चा रस्ता असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
हा व्हिडिओ रील्ससाठी बनवलेला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु, त्यांचा हा 'स्टंट' इतर वाहनचालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अचानक उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्यावर चालणाऱ्या इतर लोकांना आणि मागून येणाऱ्या वाहनांना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. रील्स बनवण्याच्या हव्यासापोटी हे तरुण स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ @RealTofanOjha नावाच्या अकाउंटवरुन X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. 'जेव्हा तुमचा सख्खा काका आरटीओ अधिकारी असेल, तेव्हा माणूस रस्ता धुराने भरुन टाकेल,' असे उपरोधिक शीर्षक या व्हिडिओला देण्यात आले आहे. हे शीर्षक व्हिडिओतील स्टंट करणाऱ्या तरुणांच्या बेपर्वाईचे आणि कायद्याची भीती नसलेल्या मानसिकतेचे दर्शन घडवते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक वापरकर्त्यांनी या कृत्याचा निषेध केला असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे.
एका यूजरने कमेंट करत 'यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे,' असे लिहिले.
दुसऱ्या एका यूजरने, 'हे अगदी खरे आहे, कायद्याची भीती नसणे हेच या बेपर्वाईचे कारण आहे,' असे मत व्यक्त केले.
सोशल मीडियावर अशाप्रकारे धोकादायक स्टंट करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. प्रसिद्धीसाठी केल्या जाणाऱ्या अशा कृत्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि इतरांनाही असे धोकादायक स्टंट करण्यास प्रोत्साहन मिळते. अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून अशा व्हिडिओ बनवणाऱ्यांवर त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.