CNG And PNG Prices: वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना लवकरच मिळणर 'गुड न्यूज'

Kirit Parikh Committee Report: सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांना येत्या काही दिवसांत चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
CNG PNG Price
CNG PNG Price Dainik Gomantak
Published on
Updated on

CNG And PNG Prices: सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांना येत्या काही दिवसांत चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकार सामान्य ग्राहकांसाठी सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करु शकते.

वास्तविक, सप्टेंबरमध्ये सरकारने सीएनजी (CNG) आणि पीएनजीची रास्त किंमत निश्चित करण्यासाठी किरीट पारेख समितीची स्थापना केली होती. ही समिती पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला (Government) सादर करु शकते. समितीने आपला अहवाल अंतिम करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी स्टॉकहोल्डर्सची शेवटची बैठक बोलावली आहे.

CNG PNG Price
CNG-PNG Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका, सीएनजी-पीएनजीचे पुन्हा वाढले दर

सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळू शकतो

या अहवालात सामान्य ग्राहकांसाठी सीएनजी-पीएनजीची किंमत कमी करण्याची शिफारस केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. ही केवळ सर्वसामान्य ग्राहकांसाठीच (Customers) नाही तर खते आणि वीज प्रकल्पांसाठीही दिलासादायक बातमी आहे. ही समिती खत आणि ऊर्जा प्रकल्प तसेच CGD साठी स्वतंत्र शिफारसी करेल.

दुसरीकडे, 1 ऑक्टोबर रोजी नैसर्गिक वायूच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सरकार दर सहा महिन्यांनी म्हणजे 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरला गॅसचे दर ठरवते. विशेष म्हणजे, या किमती अमेरिका, कॅनडा (Canada) आणि रशिया यांसारख्या गॅस-अधिशेष देशांमधील प्रचलित दरांच्या आधारावर वर्षाच्या एक चतुर्थांश अंतराने निश्चित केल्या जातात.

CNG PNG Price
CNG PNG Price: एकाच महिन्यात दुसऱ्यांदा CNG-PNG दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

तसेच, 8 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानीत सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) च्या वेबसाइटवर प्रसारित केलेल्या माहितीनुसार, दिल्लीत (Delhi) सीएनजीची किंमत 75.61 रुपये प्रति किलो वरुन 78.61 रुपये प्रति किलो वाढली आहे.

CNG PNG Price
मुंबईकरांना झटका, CNG अन् PNG च्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन किंमत

त्याच वेळी, PNG ची किंमत आता राष्ट्रीय राजधानीत 50.59 रुपये प्रति एससीएम वरुन 53.59 रुपये प्रति एससीएम झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com