CNG PNG Price Hike: मुंबईत CNG आणि PNG पुन्हा एकदा महाग झाले आहेत. शहर गॅस वितरक महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने CNG च्या दरात प्रति किलो 6 रुपयांनी वाढ केली आहे. त्याचवेळी पाइप्ड नैसर्गिक वायूही प्रति युनिट 4 रुपयांनी महागला आहे. ही दरवाढ तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे. एका महिन्यातील ही दुसरी वाढ आहे.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून, पुरवठादार आणि वितरकांना वाढत्या किमतींमुळे औद्योगिक पुरवठा कमी करणे भाग पडले. एप्रिल महिन्यापासूनची ही सहावी वाढ आहे.
महानगर गॅसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'गॅसच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आम्ही खर्च भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आम्ही सीएनजीच्या किरकोळ किमतीत 86 रुपये आणि घरगुती पीएनजी 52.50 रुपयाने वाढवले आहेत. यापूर्वी 12 जुलै रोजी मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी सीएनजीच्या किरकोळ किंमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत प्रति एससीएम 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून देशांतर्गत आणि आयातित नैसर्गिक वायूच्या किमतीत 110 टक्क्यांहून अधिक वाढ केली होती. यासह राज्याने या इंधनावरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.