DICGC Rule For Banks: HDFC-SBI-ICICI शी संबंधित बदलला 'हा' नियम, ग्राहकांच्या फायद्यासाठी 1 सप्टेंबरपासून लागू होणार

Reserve Bank of India: करोडो खातेदारांना लक्षात घेऊन ड‍िपॉज‍िट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (DICGC) सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत.
HDFC-SBI-ICICI
HDFC-SBI-ICICIDainik Gomantak

Reserve Bank of India: करोडो खातेदारांना लक्षात घेऊन ड‍िपॉज‍िट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (DICGC) सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. DICGC ने बँकांना 31 ऑगस्टपर्यंत वेबसाइट आणि इंटरनेट बँकिंग पोर्टलवर लोगो आणि QR कोड ठळकपणे प्रदर्शित करण्यास सांगितले आहे.

एचडीएफसी (HDFC), एसबीआय (SBI) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) च्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होईल. वास्तविक, या तिन्ही बँकांकडे देशातील सर्वाधिक ग्राहक आहेत.

जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला बदल

HDFC ही देशातील सर्वात मोठी बँक (Bank) आहे. दुसरीकडे, SBI बद्दल बोलायचे झाल्यास, ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. डिपॉझिट इन्शुरन्स योजनेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने डीआयसीजीसीने हे केले आहे.

DICGC 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक ठेवींचा विमा करते. व्यावसायिक बँका, स्थानिक क्षेत्र बँका (LAB), पेमेंट बँका (PB), लघु वित्त बँका (SFB), प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB) आणि सहकारी बँकांच्या ठेवी DICGC च्या विमा योजनेंतर्गत समाविष्ट आहेत.

HDFC-SBI-ICICI
Banking System: SBI-HDFC-ICICI बँक ग्राहकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी, बँकिंग व्यवस्था...!

मध्यवर्ती बँकेशी सल्लामसलत करुन निर्णय घेतला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या उपकंपनीने एका परिपत्रकात म्हटले आहे की, ड‍िपॉज‍िट इन्शुरन्स विशेषतः लहान ठेवीदारांचे संरक्षण करण्यासाठी, बँकिंग प्रणालीमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

परिपत्रकात म्हटले आहे की, 'ड‍िपॉज‍िट इन्शुरन्सबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकेशी सल्लामसलत करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामध्ये, DICGC कडे नोंदणीकृत सर्व बँका त्यांच्या वेबसाइट आणि इंटरनेट बँकिंग पोर्टलवर DICGC चा लोगो आणि DICGC वेबसाइटशी लिंक केलेला QR कोड ठळकपणे प्रदर्शित करतील.

HDFC-SBI-ICICI
SBI-HDFC-ICICI च्या ग्राहकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिला 'हा' आदेश, तुम्हीही म्हणाल...

परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, लोगो आणि QR कोड प्रदर्शित केल्याने ग्राहकांना (Customers) DICGC च्या ठेव विमा योजनेत समाविष्ट असलेल्या बँकांची ओळख पटवण्यास मदत होईल. याशिवाय ड‍िपॉज‍िट इन्शुरन्सची संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होईल.

सर्व संबंधित बँकांना 1 सप्टेंबर 2023 पासून अनुपालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. 31 मार्च 2023 पर्यंत DICGC मध्ये नोंदणीकृत विमाधारक बँकांची संख्या 2,027 होती. त्यात 140 व्यावसायिक बँकांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com