PM Kisan Latest News: पीएम किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात.
2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिलेली रक्कम शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दिली जाते. ज्या शेतकऱ्यांनी नियमानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत त्यांनाच हे पैसे दिले जातात.
या योजनेचा 13 वा हप्ता गेल्या काही दिवसांत केंद्राकडून हस्तांतरित करण्यात आला आहे. पण लाखो शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत.
चुकीचा बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक किंवा ई-केवायसी न मिळाल्याने काही पात्र अर्जदारांचे पैसे थांबले आहेत.
तुमचीही अशीच समस्या असेल तर तुम्ही ती घरबसल्या सोडवू शकता. अनेक शेतकऱ्यांना नाव बदलायचे आहे पण त्यासाठी काय करावे लागेल हे त्यांना माहीत नाही.
तुम्ही बँक खाते, आधार क्रमांक आणि नावाशी संबंधित बदल ऑनलाइन करु शकता. यासाठी तुम्हाला घराबाहेर कुठेही जाण्याची गरज नाही.
तुम्ही नाव, आधार नंबर इत्यादीमध्ये ऑनलाइन बदल करु शकता. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. डीबीटी अॅग्रीकल्चर बिहारच्या (Bihar) वेबसाइटवर संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे.
सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाइटवर जा - https://pmkisan.gov.in/.
आता फॉर्मर कॉनर्रवर चेंज बेनेफिशियरी नेम वर क्लिक करा.
येथे मागितलेला आधार क्रमांक आणि संबंधित माहिती प्रविष्ट करा.
डेटाबेसमध्ये सेव्ह केल्यावर आधार नाव बदलण्यास सांगेल.
आधार डाटाबेसमध्ये सेव्ह होत नसेल तर तुम्ही जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
पुढील चरणात, नोंदणी क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता इत्यादींशी संबंधित माहिती अपडेट करा.
आता केवायसी विचारले जाईल आणि ते अपडेट करण्यास सांगितले जाईल.
तुमचे नाव, जन्मतारीख आणि विनंती केलेली सर्व माहिती अपडेट करा.
पुढील प्रक्रियेत आधार सीडिंग तपासले जाईल.
जर तुमचे खाते बँक खात्याशी लिंक नसेल, तर तुम्हाला ते लिंक करण्यास सांगितले जाईल.
पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता तुमच्या खात्यात आला नसेल, तर तुम्ही काही नंबरवर कॉल करुन तुमची तक्रार नोंदवू शकता.
यासाठी तुम्हाला हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 वर कॉल करावा लागेल. यावेळी 8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 हजार कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.