Budget 2023: सरकार काही दिवसांत अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी खूप खास असू शकतो. दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात वेतन आयोगाबाबतही मोठी घोषणा होऊ शकते. यावेळी अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक खास बातमी समोर येऊ शकते.
वास्तविक, केंद्र सरकार 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान 8 व्या वेतन आयोगाची घोषणा करु शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
सातव्या वेतन आयोगाच्या नियमांच्या जागी 8व्या वेतन आयोगाची मागणी गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणाहून केली जात आहे. ताज्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांमध्ये चर्चा वाढत आहे की, केंद्र सरकार बजेटमध्ये 8 व्या वेतन आयोगाच्या आगमनाची घोषणा करु शकते. या मोठ्या घोषणेबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये (Employees) अपेक्षा वाढत आहेत.
जर सरकारने 8 वा वेतन आयोग जाहीर केला, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सर्वात खालच्या स्तरावरुन सर्वोच्च वेतनश्रेणीपर्यंत भरघोस वाढ होईल. नवीन वेतन आयोगाकडे वाटचाल करताना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, वेतनश्रेणी तसेच भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे. ते भविष्यात फिटमेंट फॅक्टर बूस्ट मिळविण्यासाठी देखील पात्र असतील.
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी वेतन आयोगाचे नियम साधारणपणे दर 10 वर्षांनी 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतनाच्या अलीकडील तीन घोषणांमध्ये दिसलेल्या पॅटर्ननुसार अपग्रेड केले जातात. असा अंदाज आहे की, सरकार 2023 मध्ये 8 व्या वेतन आयोगाची घोषणा करेल आणि 2026 पर्यंत त्याच्या शिफारशी लागू करेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.