Aadhar Card Update: इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून आधार कार्डसंबंधित एक महत्वाची सूचना जारी केली आहे. सर्व सरकारी डॉक्युमेंटस आधार कार्डसोबत ऑटो अपडेट होणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रोसेसला वेळ लागू शकतो. घराचा पत्ता बदलण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा मंत्रालयाकडे जाण्याची गरज उरणार अशा प्रोसेसची सरकार निर्मिती करु इच्छित आहे.
वापरकर्त्यांना महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी डिजीलॉकर उपयोगी पडेल असे मंत्रालयाने म्हटले आहे. डिजीलॉकर वापरकर्त्यांना पॅन कार्ड ( Pan Card ) , लायसन्स आणि इतर महत्वाची कागदपत्रे ठेवण्याची अनुमती देतो.
महत्वाचे म्हणजे, आधार कार्डवर केलेले बदल डिजीलॉकरमधील सर्व कागदपत्रावर देखील बदल होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय परिवहन, ग्रामीण विकास आणि पंचायती राज या मर्यादित मंत्रालयासोबत काम करत आहे. लवकरच इतर विभागातदेखील ही सिस्टिम सुरु करण्यासाठी सरकार सॉफ्टवेअर सुरु करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आधारमार्फत डिजीलॉकरमधील कागदपत्रे अपडेट करण्यासाठी ऑटो अपडेट सिस्टिम तयार करण्यात येणार आहे. ज्यामुळे लोकांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल असे सरकारने म्हटले आहे.
यामुळे खोट्या कागदपत्रांची संख्या कमी होईल आणि नोकरीच्या निमित्ताने सतत फिरत असणाऱ्या लोकांसाठीदेखील फायदेशीर राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.