Gold Price: सोनं आणखी वधारणार, जाणून घ्या काय आहेत दर

अमेरिकेचा डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोन्याच्या दरातही मोठी भरारी अपेक्षित आहे.
Gold Price
Gold PriceDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या लग्नसराईचा सिझन सुरु झालाय. त्यामुळे कापड, भेटवस्तूंसोबतच सोनं -चांदी खरेदीकडे ग्राहकांची पावलं वळताहेत. कोरोना संक्रमण आटोक्यात येऊ लागल्यानंतर सोन्याच्या दरात तेजी असल्याचे चित्र दिसू लागलंय. त्यातच आता अमेरिकेचा डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोन्याच्या दरातही मोठी भरारी अपेक्षित आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव हा 57020 रूपये इतका होता त्यासोबतच 22 कॅरेट सोनं हे 55650 रूपयांवर होते. सोन्यानं 2 फेब्रुवारी रोजी मोठा विक्रम गाठला असून हा दर 58 हजारांच्यावर गेला होता.

त्यानंतर सोन्यात सातत्यानं घसरण झाली सोबतच सोनं पुन्हा कधी भरारी घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते. आता सोन्यात पुन्हा एकदा विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.

Gold Price
Elon Musk New Tweet: एलन मस्कचे नवे ट्विट; नव्या सीईओ ची केली घोषणा

सध्या महागाईची चिंता अख्ख्या जगाला सतावते आहे. त्यासाठी भारतच नाही तर अमेरिकेतही कडक पावलं उचलली जात आहेत. त्यातून सोन्याकडे चांगल्या गुंतवणूकीच्या दृष्टीनं म्हत्त्वाचा ठरणार आहे. आंतराष्ट्रीय पातळीवरही सोन्याला चांगला भाव चढणार आहे. त्यातून चांदीच्या दरातही खूप मोठी वाढ झाली आहे.

जाणून घ्या आजचे रेट्स -

22 कॅरेट सोन्यात आज 100 रूपये प्रति 10 ग्रॅम घट झाली आहे. त्यामुळे आजचा सोन्याचा भाव हा 52550 प्रति रूपये 10 ग्रॅम इतका होता. 24 कॅरेटचा विचार केला तर तोही 70 रूपये प्रति 10 ग्रॅमनं घसरला आहे. आज त्याचा भाव 57, 310 प्रति 10 ग्रॅम झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com