Elon Musk New Tweet: एलन मस्कचे नवे ट्विट; नव्या सीईओ ची केली घोषणा

एलन मस्क यांनी नव्या सीईओची घोषणा केली आहे.
Elon Musk New Tweet
Elon Musk New TweetDainik Gomantak

Elon Musk New Tweet: एलन मस्कचे ट्विट पुन्हा सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. एलन मस्क यांनी एका कुत्र्याला ट्विटरचा नवा सीईओ बनवले आहे. हा कुत्रा मस्कचा पाळीव कुत्रा असून त्याचे नाव फ्लोकी आहे. हा शिबा इनू जातीचा कुत्रा आहे. 

यापूर्वी पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ (Twitter) होते. पण मस्क ट्विटरचे मालक झाल्यानंतर पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पराग अग्रवाल यांना हटवल्यानंतर आता एलन मस्क यांना ट्विटरसाठी नवा सीईओ मिळाला आहे.

  • फ्लोकी ट्विटरचे नवीन सीईओ

ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांना वाटते की त्यांचा कुत्रा फ्लोकी इतर सीईओंपेक्षा खूपच चांगला आहे. इथे त्याचा संदर्भ थेट पराग अग्रवाल यांच्याकडे आहे. एलन मस्कने ट्विटरला 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले होते.

केवळ अग्रवालच नाही तर मस्कने अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता मस्कने त्याचा पाळीव कुत्रा फ्लोकी याला ट्विटरच्या सीईओच्या खुर्चीवर बसवले आहे.

एलन मस्कने सीईओच्या खुर्चीवर बसलेल्या त्यांचा कुत्रा फ्लॉकीचा फोटो (Photo) शेअर केला आहे. फोटोमध्ये, फ्लोकी ब्रँडेड ब्लॅक टी-शर्ट घातलेला दिसत आहे ज्यावर सीईओ असे लिहिले आहे. फोटोमध्ये फ्लॉकी (Floki) समोर टेबलावर काही कागदपत्रे दिसत आहेत. ज्यात फ्लॉकी चे पंजाचे ठसे आणि ट्विटर (Twitter) लोगो देखील आहेत.

फ्लोकीच्या समोर एक छोटा लॅपटॉप देखील आहे. ज्यामध्ये ट्विटरचा लोगो बनवला आहे. एलन मस्कने फ्लोकीचे एक नव्हे तर तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "ट्विटरचा नवा सीईओ अप्रतिम आहे". त्याखालील आणखी एका ट्विटमध्ये मस्कने लिहिले की, “इतर लोकांपेक्षा खूप चांगले”. यानंतर मस्कने आणखी दोन ट्विट केले आहेत.

ट्विटर विकत घेण्यापूर्वी ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांना लिहिलेल्या मजकुरात मस्क यांनी ट्विटर बोर्डात सामील होणे हे वेळेचा अपव्यय असल्याचे म्हटले होते. त्यांनी लिहिले की, "मी बोर्डात सामील होत नाही. हा वेळेचा अपव्यय आहे." अग्रवाल यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल मस्कने ट्विटरचे माजी प्रमुख जॅक डोर्सी यांना मॅसेज लिहिला. डॉर्सीने मस्क आणि अग्रवाल यांच्यामध्ये मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता, पण हा प्रयत्न पूर्ण होऊ शकला नाही, असे वृत्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com