Gold Price: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 61,650 रुपयांच्या पातळीपेक्षा खूपच खाली आले होते. आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
दरम्यान, दिवाळी धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या किमती 62000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे. सण-उत्सवांसह जागतिक घडामोडींच्या परिणामस्वरूप सोन्याच्या किंमती वाढू शकतात.
बऱ्याच दिवसांपासून भावात मोठी घसरण पाहिल्यानंतर सोन्याची चमक पुन्हा वाढू लागली आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीनिमित्त भारतीय लोक सोने खरेदी करत असतात. दिवाळी आता एक महिन्यावर आली आहे. याशिवाय लग्नसराईही सुरू होणार आहे.
सणासुदीचा काळ जवळ आल्याने येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत: दिवाळी आणि धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उसळी येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक तणावाचा परिणाम
इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढत आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाचे भाव वाढण्यात होणार आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारातील चढउतारातही होणार आहे.
पुढील महिन्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविण्यास स्थगिती देऊ शकते. असे झाल्यास डॉलर कमकुवत होईल. त्यानंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत सोन्यात गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरू शकते.
पुरवठा कमी, मागणी जास्त
भारतीय रिझर्व्ह बँक यासह जगभरातील केंद्रीय बँका सतत सोन्याची खरेदी करत आहेत. 2022 मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी 1150 टन सोने खरेदी केले आहे.
गेल्या पाच दशकांतील ही सर्वात मोठी खरेदी आहे. जागतिक तणाव वाढल्यानंतर या केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली होती.
एकतर सोन्याचा नवीन पुरवठा होत नाही, परंतु मध्यवर्ती बँकांनी केलेल्या खरेदीमुळे पुरवठाही कमी होत असल्याने भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, सणासुदीची मागणी आणि जागतिक कारणांमुळे सोने 62,000 रुपये प्रति ग्रॅमच्या पातळीवर जाऊ शकते. सध्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
मे 2023 नंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली, जी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 56,627 रुपयांवर होती. मे महिन्याच्या उच्चांकावरून सोने 5000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.