IT फ्रेशर्ससाठी खुशखबर! TCS करणार 40000 फ्रेशर्सची भरती

देशातील आघाडीची IT कंपनी Tata Consultancy Services (TCS) 40,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे.
Tata Consultancy Services
Tata Consultancy ServicesDainik Gomantak
Published on
Updated on

Tata Consultancy Services: देशातील आघाडीची IT कंपनी Tata Consultancy Services (TCS) 40,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे. ही भरती प्रक्रिया कॅम्पस बेस्ड असेल. म्हणजेच कंपनी कॅम्पस सिलेक्शन करेल.

टीसीएसचे सीओओ एन गणपति सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कंपनी चालू आर्थिक वर्षात 40,000 फ्रेशर्सची भरती करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

"आम्ही साधारणपणे 35,000 ते 40,000 फ्रेशर्सची भरती करणार आहोत. आम्ही त्या दिशेने काम करत आहोत," असेही ते पुढे म्हणाले. TCS मध्ये 6.14 लाख कर्मचारी आहेत.

दरम्यान, आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये ही प्रक्रिया थांबलेली असताना टीसीएसमध्ये ही बंपर भरती करत आहे.

अलीकडेच, इन्फोसिसचे (Infosys) सीएफओ निलांजन रॉय म्हणाले होते की, गेल्या वर्षी कंपनीने 50,000 फ्रेशर्सची भरती केली होती. मागणी जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत कंपनी कॅम्पसमध्ये जाणार नाही.

Tata Consultancy Services
TCS कंपनीत जॉबच्या नावाखाली 100 कोटी रुपयांचा घोटाळा; RMG संबधित घोटाळा नेमका काय? जाणून घ्या सविस्तर

कंपनी नोकरभरतीतील वादात अडकली

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नोकरभरतीतील घोटाळ्यासंबंधी वादात अडकली आहे. अलीकडेच, कंपनीने 16 कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकताना सहा पुरवठादारांसोबत व्यवसाय करण्यास नकार दिला.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, तपासात 19 कर्मचारी गुंतलेले आढळले, त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांनी (Employees) कोड ऑफ कंडक्टचा भंग केल्याबद्दल काढून टाकण्यात आले तर तीन कर्मचाऱ्यांना संसाधन व्यवस्थापनाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.

त्याचबरोबर, सहा पुरवठादार (विक्रेते), त्यांचे मालक आणि सहयोगी यांना TCS सोबत व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली.

Tata Consultancy Services
BSNL 4G आता टाटा नेटवर्कवर चालणार, सरकारी कंपनीने TCS ला दिली कोट्यवधीची ऑर्डर

वर्क फ्रॉम होम कल्चर संपले आहे

TCS ने कोविड-19 महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास कंपनीने परवानगी दिली होती. मात्र आता, वर्क फ्रॉम होम कल्चर कंपनीने संपवले. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 70 टक्के कर्मचारी कार्यालयात येऊ लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com