Pan Card अन् Salary Slip शिवायही मिळू शकते पर्सनल लोन, जाणून घ्या कसे ते !

Personal Loan: अनेक वेळा लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते.
Money
MoneyDaINIK Gomantak

Personal Loan: अनेक वेळा गरजूंना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. त्याचबरोबर बँकाही लोन देताना अनेक कागदपत्रे घेतात. पर्सनल लोन देण्यासाठी बँकांना आवश्यक कागदपत्रे देणेही गरजेचे असते. मात्र, ज्याला लोन हवे आहे, त्याच्याकडे पॅनकार्ड आणि सॅलरी स्लिपही नसल्याची परिस्थिती अनेकवेळा पाहण्यात आली आहे. तथापि, पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिप नसतानाही तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते.

पॅन कार्ड

पॅन कार्ड (PAN Card) हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये करदात्याची आर्थिक माहिती असते. शिवाय, पर्सनल लोनसाठी पूर्णपणे डिजिटल अर्जाच्या बाबतीत, ओळख आणि आर्थिक विश्वासार्हता सत्यापित करण्यासाठी आणि राष्ट्रीयत्व तसेच कर माहितीचे प्रमाणीकरण करण्यासाठी पॅन आणि आधार हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट बनते.

Money
Pan Card Update: पॅन कार्ड देखील होते कालबाह्य? जाणून घ्या महिती

क्रेडिट स्कोअर

CIBIL स्कोअर 700 आणि त्याहून अधिक असल्याने, लोन देणारी कंपनी कागदपत्रांशिवाय पर्सनल लोन देण्यास मागेपुढे पाहत नाही. उच्च क्रेडिट स्कोअरमुळे आर्थिक विश्वासार्हता वाढते.

मागील रेकॉर्ड

जर तुम्ही पूर्वी लोन घेतले असेल आणि तुम्ही ते वेळेवर भरले असेल तर ते तुमचे चांगले रेकॉर्ड दर्शवते. बँका (Banks) किंवा वित्तसंबंधित कंपन्या मागील रेकॉर्ड पाहूनही पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिपशिवाय पर्सनल लोन देतात.

Money
PAN Card Update: पॅन कार्ड धारकांसाठी सरकारने जारी केली महत्त्वाची माहिती! जाणून घ्या

Collateral Security

जर तुम्ही कोणतीही कागदपत्रे सादर करु शकत नसाल तर तुम्ही तुमची कोणतीही मालमत्ता सुरक्षा म्हणून जमा करुन पर्सनल लोन घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com