पोस्ट ऑफसच्या या योजनेत मिळवा 7.1 टक्के रिटर्न

पोस्ट ऑफिस PPF स्कीममध्ये, गुंतवणूकदारांना दरवर्षी 7.1% व्याज दर मिळतो.
Post Office Scheme
Post Office SchemeDainik Gomantak

पोस्ट ऑफिस (Post Office) गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देणार्‍या विविध सुरक्षित योजना ऑफर करत असते. तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट (PPF) योजनेचाही गुंतवणुकीसाठी विचार करू शकता.

Post Office Scheme
इथेच रोवला 'हमारा बजाज' चा पाया

पोस्ट ऑफिस PPF स्कीममध्ये, गुंतवणूकदारांना दरवर्षी 7.1% व्याज दर मिळतो. पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेत एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये ते कमाल 1 लाख 50 हजार रुपये गुंतवू शकता.

पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेबद्दल गुंतवणूकदार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर अधिक जाणून घेऊ शकता. पॉलिसीमध्ये एकरकमी किंवा एकमुदतीची गुंतवणूक देखील करता येते.

प्रौढ भारतीय नागरिक थेट त्यांचे पीपीएफ खाते देखील उघडू शकतात. तर अल्पवयीन व्यक्तीच्या बाबतीत, पालक 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसाठी पोस्ट ऑफिस पीपीएफ खाते उघडू शकतात.

Post Office Scheme
एबीजी शिपयार्डने 28 बँकांची केली फसवणूक, सीबीआयने नोंदवला एफआयआर

या शिवाय, गुंतवणूकदार (Investors) आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत त्यांच्या पोस्ट ऑफिस PPF गुंतवणुकीवर कर लाभ घेऊ शकतात. तसेच, आयकर पीपीएफ योजनेतील व्याज आणि परिपक्वता यातून मिळणारे उत्पन्न करमुक्त असते.

गुंतवणूकदार त्यांच्या पासबुकसह खाते बंद करण्याची कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करून मॅच्युरिटी पेमेंट देखील करू शकतात. शिवाय, त्या संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये कागदपत्रे जमा करून अतिरिक्त व्याज उत्पन्न मिळविण्यासाठी मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांनी वाढवू शकतात.

गुंतवणूकदारांनी हे देखील लक्षात ठेवावे की खाते उघडण्याचे वर्ष वगळून पाच वर्षांनी ते आर्थिक वर्षातून एकदा त्यांचे पैसे काढू शकतात आणि 4थ्या आधीच्या वर्षाच्या शेवटी किंवा आधीच्या वर्षाच्या शेवटी, जे कमी असेल ते पैसे काढण्याची रक्कम शिल्लक रकमेच्या 50 टक्के मर्यादित असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com