Gautam Adani: अदानी अभी जिंदा है! श्रीमंतांच्या यादीत घेतली मोठी झेप; हिंडेनबर्ग रिपोर्टचा बसला होता फटका

Gautam Adani Net Worth: गौतम अदानी यांच्या संपत्तीत आता कमालीची वाढ झाली आहे. अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी 12 अंकानी झेप घेतली आहे.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak
Published on
Updated on

Gautam Adani Net Worth: गौतम अदानी यांच्या संपत्तीत आता कमालीची वाढ झाली आहे. अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी 12 अंकानी झेप घेतली आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे अदानींच्या संपत्तीतही घसरण झाली आणि ते श्रीमंतांच्या यादीत 34व्या स्थानावर पोहोचले. सध्या त्यांनी पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे.

नेट वर्थ किती वाढली

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानींची एकूण संपत्ती गेल्या 24 तासांत $1.97 अब्जने वाढून $54 अब्ज झाली आहे आणि आता 22व्या स्थानावर पोहोचले आहेत.

त्याचवेळी, यापूर्वी ते 34 व्या स्थानावर होते. हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी रोजी प्रकाशित झाला होता, त्यानंतर अदानी समूहाचे (Adani Group) शेअर्स दररोज लोअर सर्किटमध्ये अडकत होते.

Gautam Adani
Gautam Adani: अदानींनी 3 कंपन्यांचे शेअर्स ठेवले गहाण, ग्रुप गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणार का?

तारण ठेवले शेअर्स

यासोबतच, अग्रगण्य कंपनीकडून घेतलेल्या कर्जासाठी सुरक्षा म्हणून अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स गहाण ठेवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत.

SBI कॅप ट्रस्टीने शेअर बाजाराला माहिती दिली की, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​आणखी 0.99 टक्के शेअर्स अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या कर्जदारांच्या फायद्यासाठी तारण ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, अदानी ट्रान्समिशन लिमिटेडचे ​​0.76 टक्के शेअर्स बँकांकडे तारण ठेवले आहेत.

Gautam Adani
Gautam Adani : गौतम अदानी टॉप-30 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर; अदानींकडे शिल्लक राहिली 'एवढीच' संपत्ती

एसबीआयने माहिती दिली

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे एक युनिट, SBI कॅप, तथापि, अदानी एंटरप्रायझेसने किती कर्ज घेतले आहे, ज्यासाठी शेअर्स तारण ठेवले आहेत याची माहिती दिली नाही.

अलीकडील घडामोडींनंतर, SBI कॅपने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​दोन टक्के शेअर्स (Shares) तारण ठेवले आहेत. अदानी ट्रान्समिशनच्या बाबतीत हा आकडा 1.32 टक्के आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी अदानी समूहाने 7,374 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com