गौतम अदानी बनले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींना टाकले मागे

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील घसरणीचा फायदा गौतम अदानी (Gautam Adani) यांना झाला आहे. मंगळवारी, गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकले आहे.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील घसरणीचा फायदा गौतम अदानी यांना झाला आहे. मंगळवारी, गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. रिलायन्सच्या समभागांमध्ये मोठ्या घसरणीमुळे ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. (Gautam Adani Became The Richest Man In The Country leaving Behind Mukesh Ambani)

दरम्यान, फोर्ब्सच्या रिअल टाइम नेट वर्थ डेटानुसार, अदानी यांची मालमत्ता सध्या सुमारे 6.72 लाख कोटी रुपये आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची संपत्ती 6.71 लाख कोटी रुपये आहे. याशिवाय गौतम अदानी (Gautam Adani) हे सध्या जागतिक स्तरावर जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Gautam Adani
Aadhaar Card Update: घर बसल्या बदला मोबाईल नंबर!

शिवाय, आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर 2021 पर्यंत अदानीची मालमत्ता 5.82 लाख कोटी रुपये होती. 18 जानेवारीला ती वाढून 6.95 लाख कोटी रुपये झाली होती. त्यानुसार, 2022 मध्ये अदानीच्या एकूण मालमत्तेत दररोज 6000 कोटी रुपयांची वाढ होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com