Personal Loan: स्वस्त पर्सनल लोनसाठी या 4 बँका सर्वोत्तम पर्याय

Personal Loan On Lowest Interest Rate: या 4 बँका परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्ज देत आहेत. यामध्ये एक बँक अशी आहे जी एक रुपयाही प्रक्रिया शुल्क आकारत नाही.
Personal Loan On Lowest Interest Rate
Personal Loan On Lowest Interest RateDainik Gomantak

Personal Loan On Lowest Interest Rate:

अनेकदा लोक पैशांची गरज असताना बँकांकडून पर्सनल लोन घेतात. या कर्जातून ते त्यांच्या गरजा पूर्ण करतात.

या गरजांमध्ये अनेक प्रकारचे खर्च समाविष्ट असतात जसे की, लॅपटॉप-मोबाईलसारखे गॅझेट, घराच्या दुरुस्तीसाठी पैसे आणि इतर अनेक वैयक्तिक खर्चाचा त्यात समाविष्ट केला जाऊ शकतो.

रेपो रेटमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे अनेक बँकांनी त्यांचे व्याजदरही वाढवले ​​आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या अत्यंत कमी व्याजदराने पर्सनल लोन देत आहेत.

1. बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) आपल्या ग्राहकांना 10 ते 12.80% व्याजदराने पर्सनल लोन देत आहे. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला एकूण कर्जाच्या रकमेच्या 1% आणि प्रक्रिया शुल्क म्हणून GST भरावा लागेल.

2. एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना 10.50% ते 24% व्याजदराने पर्सनल लोन देत आहे. हे कर्ज घेताना तुम्हाला 4,999 रुपये प्रोसेसिंग फी देखील भरावी लागेल.

Personal Loan On Lowest Interest Rate
Aadhaar Card: घरबसल्या मिळवा ब्लू आधार कार्ड; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

3. स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 11% ते 14% व्याज दराने पर्सनल लोन देत आहे. तुम्हाला कर्ज घेताना तुमच्या कर्जाच्या रकमेवर एकूण रकमेच्या 1.50% किंवा 1,000 ते 15,000 यापैकी जे कमी असेल ती रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागेल.

Personal Loan On Lowest Interest Rate
Property Transfer: सरकारचा नवा निर्णय; आता फक्त 5 हजारांत होणार नातेवाईकांच्या नावे करोडोंची प्रॉपर्टी

4. कॅनरा बँक

कॅनरा बँक (Canara Bank) 10.65% ते 16.25% व्याजदरावर पर्सनल लोन देत आहे. या बँकेची एक खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरावे लागणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com