Inflation Hike 2026: साबण, चॉकलेटपासून मोबाईल रिचार्जपर्यंत... सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; कच्चा माल महागल्याने महागाईचा उडणार भडका

FMCG Products Price Hike Raw Material Cost: सामान्य जनतेच्या खिशावर महागाईचा आणखी एक मोठा भार पडण्याची शक्यता निर्माण झाली.
FMCG Products Price Hike Raw Material Cost
Inflation Hike 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

FMCG Products Price Hike Raw Material Cost: सामान्य जनतेच्या खिशावर महागाईचा आणखी एक मोठा भार पडण्याची शक्यता निर्माण झाली. क्रिसिल, एलारा आणि कोटक निओ यांसारख्या नामांकित संस्थांच्या विश्लेषकांच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे एफएमसीजी कंपन्यांसाठी कच्चा माल तब्बल 74 टक्क्यांपर्यंत महाग झाला. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होत असून येत्या काही दिवसांत दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढणे अटळ मानले जात आहे.

यामुळे येत्या काळात साबण, टूथपेस्ट, चॉकलेट, खाद्यतेल, चहा आणि बिस्किटे यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू महाग होऊ शकतात. वाढत्या उत्पादनाचा खर्च भागवण्यासाठी कंपन्या आपल्या उत्पादनांचे दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.

FMCG Products Price Hike Raw Material Cost
PM Kisan 24th Installment Date: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! 30 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार 24वा हप्ता; चेक करा तुमचे स्टेटस

आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षाच्या तुलनेत कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली. क्रूडपासून तयार होणारा माल 74 टक्क्यांपर्यंत, प्लास्टिक रेझिन 60 टक्के आणि कोको 46 टक्क्यांनी महाग झाला. तसेच वाहतूक खर्च म्हणजेच ट्रक भाडे 13 टक्के, घाऊक साखर 12.7 टक्के आणि आयात केलेले पाम तेल 10 टक्क्यांनी महागले. याशिवाय खाद्यतेल, चहा, दूध आणि मक्याच्या दरातही मोठी वाढ झाली.

FMCG Products Price Hike Raw Material Cost
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो सावधान! 'या' 3 कारणांमुळे अडकू शकतो 2,000 रुपयांचा हप्ता

कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल जवळपास $113 वर पोहोचल्याने उत्पादनाचा खर्च कमालीचा वाढला आहे. आतापर्यंत कंपन्या जुन्या स्टॉकच्या आधारे काम चालवत होत्या, परंतु जुना साठा संपताच वाढीव दरांचा थेट फटका ग्राहकांना बसेल.

FMCG Products Price Hike Raw Material Cost
PM Kisan: खूशखबर! पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची तारीख ठरली; 'या' दिवशी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये

केवळ अन्नधान्य आणि रोजच्या वस्तूच नव्हे, तर मोबाईल वापरकर्त्यांसाठीही वाईट बातमी आहे. अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्या या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरपर्यंत मोबाईल टॅरिफमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ करु शकतात. तसेच पुढील 10 वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी मोबाईल सेवा 12 टक्क्यांनी महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली. एका बाजूला कमी पावसामुळे ग्रामीण भागातील मागणीवर परिणाम झाला असताना, आता एफएमसीजी वस्तू आणि मोबाईल रिचार्ज महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com