PM Kisan 24th Installment Date: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! 30 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार 24वा हप्ता; चेक करा तुमचे स्टेटस

PM Kisan 24th Installment Release Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या देशभरातील कोट्यवधी बळीराजासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली.
PM Kisan 24th Installment Release Date
PM Kisan Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Kisan 24th Installment Release Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या देशभरातील कोट्यवधी बळीराजासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारने 24वा हप्ता वितरित करण्याची अधिकृत तारीख जाहीर केली. येत्या 30 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपयांची रक्कम खात्यात जमा करणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत देते, जी दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. जून 2026 मध्ये योजनेचा 23वा हप्ता जारी करण्यात आला होता आणि आता 30 ऑक्टोबरला 24व्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातील.

PM Kisan 24th Installment Release Date
PM Kisan Portal Update: 24व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान पोर्टलमध्ये मोठा बदल! शेतकऱ्यांसाठी 4 महत्त्वाच्या सुविधा सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुम्हालाही या हप्त्याचा लाभ अडथळ्याशिवाय हवा असेल, तर 30 ऑक्टोबरपूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमच्या रेकॉर्डमध्ये काही चूक असेल तर हप्ता अडकू शकतो. यासाठी सर्वात आधी ई-केवाईसी पूर्ण असणे बंधनकारक आहे, जे तुम्ही पीएम-किसान पोर्टलवर आधार ओटीपीद्वारे, पीएम-किसान (PM Kisan) ॲपवर फेस ऑथेंटिकेशनने किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन पूर्ण करु शकता.

PM Kisan 24th Installment Release Date
PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

याशिवाय, तुमच्या शेतजमिनीची नोंद पोर्टलवर सत्यापित असावी; ती प्रलंबित असल्यास संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि एनपीसीआय मॅपिंग असणे गरजेचे आहे, कारण पैसे थेट डीबीटीने जमा होतात. आधार कार्ड आणि रजिस्ट्रेशनमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक असल्यास पोर्टलवरुन ते लगेच दुरुस्त करुन घ्या.

PM Kisan 24th Installment Release Date
PM Kisan Scheme Update: 'पीएम किसान योजना' बंद होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केला पुढील पाच वर्षांचा रोडमॅप

शेतकऱ्यांनी आपला हप्ता येणार की नाही हे तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करावे. तिथे तुमचा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर e-KYC, Land Seeding आणि Aadhaar Bank Account Linking या तिन्ही पर्यायांपुढे 'Yes' लिहिलेले असणे आवश्यक आहे. जर तिन्ही ठिकाणी 'Yes' असेल, तर 30 ऑक्टोबरला 24व्या हप्त्याची रक्कम कोणत्याही अडथळ्याविना तुमच्या खात्यात जमा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com