Business Idea: 9 ते 5 जॉबचा कंटाळा आलाय? घरी बसून करता येतील असे 5 बिझनेस, कमवा पगारापेक्षा जास्त पैसे

म्ही जर सुशिक्षित असाल आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहायचे असेल, तर असे अनेक छोटे व्यवसाय आहेत जे तुम्ही तुमच्या घरातच सुरू करू शकता.
Business Idea
Business Ideadainik gomantak
Published on
Updated on

5 Smart Business Idea: सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत नोकरी करण्याचा अनेकांना कंटाळा येतो, रोज कामात तोचतोचपणा आयुष्य कंटाळवाणे करतो. पण, अलिकडे डिजिटल युगात अनेक व्यवसाय आहेत जे घरी बसून करता येतील आणि त्यासाठी कमी गुंतवणूक लागेल शिवाय उत्पन्न देखील अधिक मिळेल.

कोरोनाच्या काळात सुरू झालेले वर्क फ्रॉम होम (WFH) देखील खूप लोकप्रिय झाले आहे. लोक आता अशी नोकरी निवडण्यास प्राधान्य देत आहेत. तुम्ही जर सुशिक्षित असाल आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहायचे असेल, तर असे अनेक छोटे व्यवसाय आहेत जे तुम्ही तुमच्या घरातच सुरू करू शकता.

1) ब्लॉगिंग आणि कंटेट लेखन

तुमची एखाद्या विशिष्ट विषयावर चांगली पकड असेल, जर तुम्ही उत्तम प्रकारे लिहू शकता तर, ब्लॉगिंग आणि कंटेट लेखन क्षेत्र तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्हाला कोणत्याही विषयावर मजकूर लिहिण्याची आवड असेल, तर तुम्ही विविध संस्थांमध्ये अर्धवेळ नोकरी करू शकता.

याशिवाय तुम्ही तुमच्या विषयावर व्हिडिओ बनवून तो यूट्यूबवर अपलोड करू शकता. विषय रंजक असेल तर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध व्हाल. आजच्या युगात यूट्यूब हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. काही ब्लॉग प्लॅटफॉर्म वाचकांनुसार कंटेट लेखकांना पैसे देतात. तर बहुतांश ब्लॉगच्या बाबतीत, जाहिराती Google Adsense द्वारे प्राप्त होतात.

उदाहरणार्थ, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बद्दल तपशीलवार माहिती गोळा करून व्हिडिओ बनवू शकता. याशिवाय, आजकाल लोक YouTube ब्लॉगच्या माध्यमातूनही भरपूर कमाई करत आहेत.

Business Idea
LCA Tejas ASTRA Video: गोव्याच्या किनाऱ्यावर तेजसची चाचणी, 20,000 फूट उंचीवरुन क्षेपणास्त्राचा यशस्वी मारा

2. कोचिंग क्लासेस

तुम्ही जर चांगले शिक्षण घेतले असेल आणि एखाद्या विषयावर तुमची पकड असेल, तर तुम्ही मुलांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन शिकवू शकता. गेल्या काही वर्षांत ऑनलाइन कोचिंगकडे लोकांचा कल झपाट्याने वाढला आहे.

तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मुलांना आधी घरी बसून शिकवू शकता, जेव्हा मुले जास्त असतील तेव्हा तुम्ही कोचिंग इन्स्टिट्यूट उघडू शकता. जिथे तुम्ही सर्व विषयांसाठी शिक्षक ठेवून तुमचा व्यवसाय वाढवू शकता. छोट्या नोकरीपेक्षा यातून चांगले उत्पन्न मिळेल.

3. प्लेसमेंट सेवा

आजकाल सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये कामगार भरती प्लेसमेंट एजन्सीद्वारे केली जाते. विशेषत: सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, मदतनीस आणि सर्व प्रकारचे तांत्रिक कामगारांची प्लेसमेंट एजन्सीमार्फत होते. तुम्ही कुठूनही प्लेसमेंट एजन्सी सुरू करू शकता.

यासाठी तुम्ही मोठ्या कंपन्यांशी टाय-अप करू शकता आणि तुमच्या एजन्सीद्वारे बेरोजगारांना रोजगार देऊ शकता. कोणताही मोठा खर्च न करता हा एक चांगला छोटा व्यवसाय आहे.

4. अनुवादक

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांत तुम्ही जर भाषांतर करण्यात तज्ञ असाल तर तुम्ही घरबसल्या कमाई करू शकता. हे एक उत्तम अर्धवेळ काम आहे. आजच्या युगात तुम्ही ऑनलाइन ट्रान्सलेटर बनून तुमच्या करिअरला झळाळी देऊ शकता.

या क्षेत्रात तुम्ही तुमच्यासोबत अनेकांना रोजगार देऊ शकता. याशिवाय आजकाल वेबसाइट डिझायनर आणि डेव्हलपरला विशेष मागणी आहे. अशा लोकांशी संपर्क साधून तुम्ही मोबाईल अॅप आणि वेबसाइट बनवण्याचे काम सुरू करू शकता.

5. ऑनलाइन व्यवसाय

अगदी कमी पैशात तुम्ही ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही Flipkart-Amazon सारख्या वेबसाइट्सद्वारे विविध प्रोडक्ट विकू शकता. पण, त्यासाठी प्रथम तुम्हाला कोणत्या उत्पादनाला जास्त मागणी आहे ही माहिती गोळा करावी लागेल. तुम्ही त्या उत्पादनाच्या निर्मात्याशी थेट संपर्क साधू शकता. हळूहळू तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. मोठ्या शहरात राहून हा व्यवसाय सहज करता येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com