LCA Tejas ASTRA: स्वदेशी बनावटीच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजसने बुधवारी गोव्याच्या किनाऱ्यावर हवेतून हवेत मारा करणाऱ्या व्हिज्युअल रेंज (BVR) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. सुमारे 20,000 फूट उंचीवर असलेल्या विमानातून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चाचणीचे परीक्षण एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (NDA), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) आणि सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन (CEMILAC) आणि एरोनॉटिकल क्वालिटी अॅश्युरन्स डायरेक्टरेट जनरल (DG-AQA) चे अधिकाऱ्यांनी केले.
एलसीए तेजस क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केले. या चाचणीमुळे तेजसची लढाऊ क्षमता वाढेल आणि आयात शस्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल. असे ते म्हणाले.
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
- क्षेपणास्त्र स्वदेशी असून त्याची हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता आहे.
- व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे हल्ला करण्यास सक्षम.
- अतिशय जलद आणि अचूक लक्ष्य गाठण्यास सक्षम.
- क्षेपणास्त्र लक्ष्यावर आदळल्यानंतर ऑप्टिकल प्रॉक्सिमिटी फ्यूजचा स्फोट होतो.
- क्षेपणास्त्राचे वजन 154 किलो, लांबी 12.6 फूट, व्यास 7 इंच, फायर पॉवर 160 किमी आहे.
- क्षेपणास्त्र उच्च-स्फोटक, पूर्व-विखंडित एचएमएक्स वॉरहेड्स वाहून नेऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.