EPFO Pension: तुम्हीही नोकरी करत असाल आणि तुमचा EPF तुमच्या पगारातून कापला जात असेल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. ईपीएस अंतर्गत पगारदार वर्गाला मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. आता याबाबत नवीन अपडेट म्हणजे 'EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती'ने किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयांवरुन 7,500 रुपये करण्यासाठी कामगार मंत्रालयाला 15 दिवसांची नोटीस दिली आहे.
देशव्यापी आंदोलनाचा इशारा
समितीने दिलेल्या नोटीसमध्ये मागणी पूर्ण न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असे म्हटले आहे. कर्मचारी पेन्शन योजना-1995 म्हणजेच EPS-95 ही सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवली जाते. या अंतर्गत सहा कोटींहून अधिक भागधारक आणि 75 लाख पेन्शनधारक लाभार्थी आहेत.
पेन्शनधारकांच्या वैद्यकीय सुविधाही मर्यादित आहेत
केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात संघर्ष समितीने म्हटले की, EPS-95 पेन्शनधारकांची पेन्शन रक्कम खूपच कमी आहे. याशिवाय वैद्यकीय सुविधाही मर्यादित आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पंधरा दिवसांत या पेन्शन रकमेत वाढ जाहीर न केल्यास देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, असेही या पत्रात म्हटले आहे. याअंतर्गत रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद करुन आमरण उपोषणासारखे पाऊल उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच, समितीने नियमित अंतराने जाहीर केलेल्या महागाई भत्त्यासह किमान निवृत्ती वेतन 1,000 रुपयांवरुन 7,500 रुपये करण्याची मागणी केली आहे. यासोबतच समितीने 4 ऑक्टोबर 2016 आणि 4 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रत्यक्ष वेतनावर पेन्शन देण्याची मागणीही केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.