ईपीएफओचा नवा रेकॉर्ड, नोकरी करणाऱ्यांची संख्या वाढली!

EPFO Members in July 2023: देशभरात नोकरदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्यातही ईपीएफओमध्ये सामील होणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
EPFO
EPFODainik Gomantak
Published on
Updated on

EPFO Members in July 2023: देशभरात नोकरदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्यातही ईपीएफओमध्ये सामील होणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जुलै 2023 मध्ये एकूण 18.75 लाख सदस्य जोडले आहेत. कोणत्याही एका महिन्यात संस्थेत सामील होणाऱ्या भागधारकांची ही कमाल संख्या आहे.

संघटित क्षेत्रात नोकऱ्या मिळवणाऱ्यांबाबत जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, सप्टेंबर 2017 पासून EPFO ​​पेरोल डेटा प्रकाशित झाल्यापासून कोणत्याही महिन्यात 18.75 लाख सदस्यांची ही सर्वाधिक वाढ आहे, असे कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

EPFO सदस्यांची संख्या गेल्या तीन महिन्यांपासून वाढत आहे आणि जूनमध्ये हा आकडा 85,932 होता.

EPFO
EPFO: मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी, PF वरील व्याज वाढलं; 6 कोटी नोकरदारांच्या...

गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक आहे

आकडेवारी दर्शवते की, जुलै 2023 मध्ये सुमारे 10.27 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे, जी जुलै 2022 नंतर सर्वाधिक आहे.

18-25 वयोगटातील नवीन सदस्य

EPFO मध्ये सामील होणारे बहुतेक नवीन सदस्य हे 18-25 वयोगटातील आहेत. एकूण सदस्यांमध्ये त्यांचा वाटा सुमारे 58.45 टक्के आहे.

12.72 लाख सदस्य पुन्हा आले

ज्यांना नियमित पगारावर नोकरी मिळाली त्यांच्या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, बाहेर गेलेले सुमारे 12.72 लाख सदस्य पुन्हा ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत. हा दर गेल्या 12 महिन्यांतील उच्चांक आहे.

या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या बदलल्या आणि EPFO ​​अंतर्गत पुन्हा रुजू झाले. तसेच, त्यांनी अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्याऐवजी त्यांच्या ठेवी हस्तांतरित करणे पसंत केले.

3.86 लाख महिला सामील झाल्या

आकडेवारीनुसार, जुलै 2023 मध्ये सुमारे 3.86 लाख महिला सदस्य EPFO ​​मध्ये सामील झाल्या. सुमारे 2.75 लाख महिला सदस्य प्रथमच सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आल्या आहेत.

EPFO
EPFO Higher Pension Scheme: पेन्शनधारकांचे बल्ले-बल्ले, उद्यापासून 'या' लोकांना मिळणार पेन्शन; परिपत्रक जारी!

राज्य डेटावरुन प्राप्त माहिती

राज्यनिहाय विश्लेषण दाखवते की, महाराष्ट्र (Maharashtra), तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्ये सर्वाधिक निव्वळ वाढ झाली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पगाराचा डेटा तात्पुरता आहे, कारण डेटा गोळा करणे ही एक सतत प्रक्रिया आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com