Paytm-Razorpay च्या ठिकाणांवर ईडीची छापेमारी

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेंगळुरुमधील ऑनलाइन पेमेंट गेटवे- Razorpay, Paytm, Cashfree च्या कार्यालयावर छापा टाकला आहे.
Paytm
PaytmDainik Gomantak
Published on
Updated on

Paytm-Razorpay: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेंगळुरुमधील ऑनलाइन पेमेंट गेटवे- Razorpay, Paytm, Cashfree च्या कार्यालयांवर छापा टाकला आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सहा परिसरात सुरु केलेली शोध मोहीम अजूनही सुरु आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, तपास यंत्रणेने छाप्यांदरम्यान मर्चेंट आयडी आणि चिनी लोकांच्या बँक खात्यांमध्ये ठेवलेले 17 कोटी रुपये जप्त केले आहेत.

ते कसे काम करत होते: या संस्थांच्या कामाची पद्धत अशी आहे की, ते भारतीय लोकांची बनावट कागदपत्रे वापरतात आणि त्यांना डमी संचालक बनवतात. या संस्था चीनमधील (China) व्यक्तींद्वारे नियंत्रित/ऑपरेट केल्या जातात.

Paytm
Paytm: विजय शेखर शर्मा यांची पेटीएमचे MD, CEO म्हणून पुनर्नियुक्ती

तपास कोणत्या आधारावर सुरु: ईडीच्या (ED) म्हणण्यानुसार, तपासाचे हे प्रकरण सायबर क्राइम पोलिस स्टेशन, बेंगळुरुने नोंदवलेल्या 18 एफआयआरवर आधारित आहे. ही एफआयआर अनेक संस्था/व्यक्तींविरुद्ध नोंदवण्यात आली आहे. यामध्ये मोबाईल अॅपद्वारे अल्प रकमेचे कर्ज घेऊन संस्था किंवा व्यक्तींची पिळवणूक आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Paytm
Paytm वरून गॅस सिलिंडर बुक केल्यास कंपनी देणार कॅशबॅक

ईडीने पुढे सांगितले की, 'शोध मोहिमेत रेझरपे प्रायव्हेट लिमिटेड, कॅशफ्री पेमेंट्स, पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड आणि चिनी लोकांद्वारे नियंत्रित / चालवल्या जाणार्‍या संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com