Paytm MD: विजय शेखर शर्मा यांची पेटीएमचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. 99.67 टक्के भागधारकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले आहे. पेटीएम भारतातील अग्रगण्य डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी, QR,मोबाइल पेमेंटची प्रणेता आहे. (Vijay Shekhar Sharma reappointed Paytm MD CEO)
अलीकडेच सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी म्हणून पहिली 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आयोजित केली आहे. कंपनीच्या "व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी" म्हणून नियुक्त केलेल्या विजय शेखर शर्मा यांची आणखी पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्याच्या बाजूने कंपनीच्या भागधारकांनी 99.67 टक्के बहुमताने मतदान केले आहे.
विजय शेखर शर्माच्या पुनर्नियुक्तीच्या बाजूने जवळपास 100 टक्के मिळालेली जबरदस्त मते ही कंपनीच्या नेतृत्वावरील गुंतवणूकदारांचा विश्वास प्रतिबिंबित करते आणि ते कंपनीच्या वाढ आणि नफा लक्ष्याबाबत विश्वास ठेवत असल्याचे देखील दर्शवते," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी मे 2022 मध्ये, OCL च्या संचालक मंडळाने शर्मा यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती. याव्यतिरिक्त, SEBI ने फेब्रुवारी 2022 मध्ये, India Inc साठी स्वतंत्र अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी असणे ऐच्छिक केले होते. बहुतेक निफ्टी 50 कंपन्यांमध्ये, व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती नॉन-रोटेशनल आधारावर केली जाते. शर्मा यांच्या मानधनाच्या ठरावाच्या बाजूने 94.48 टक्के मते मिळाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.