Airtel SpaceX Agreement: इलॉन मस्क यांची स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट सेवा आता भारतात; एअरटेलसोबत मोठा करार

Airtel brings Elon Musk's SpaceX to India :एअरटेल आणि स्पेसएक्स स्टारलिंक एअरटेल नेटवर्कचा अधिक विस्तार कसा करू शकतात याचा देखील विचार केला जाईल.
Starlink Highspeed Internet
Airtel SpaceX AgreementDainik Gomantak
Published on
Updated on

Bharti Airtel News, Starlink Internet

एअरटेलने भारतीय ग्राहकांसाठी स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी इलॉन मस्कच्या SpaceX सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. Airtel ने मंगळवारी (11 मार्च, 2025) भारतीय ग्राहकांना स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी अमेरिकन अब्जाधीश मस्क यांच्या सॅटेलाइट कंपनी SpaceX सोबत भागीदारी केली आहे.

भारतातील एअरटेल ग्राहकांना स्टारलिंक सेवा देण्यासाठी SpaceX सोबत काम करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले.

"हा करार भारतातील अगदी दुर्गम भागातही जागतिक दर्जाचे हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा देण्याची आमची क्षमता वाढवते. प्रत्येक व्यक्ती, व्यवसाय आणि समुदायाकडे विश्वसनीय इंटरनेट असेल याची निश्चिती करते. स्टारलिंक एअरटेलच्या भागीदारीमुळे भारतीय ग्राहकांसाठी विश्वासार्ह आणि परवडणारे ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी मदत होणार आहे," असे विठ्ठल म्हणाले.

Starlink Highspeed Internet
Late Night Sleep: रात्रभर मोबाईल पाहण्याच्या नादात झोपायचं विसरताय? मग गंभीर मानसिक आजारांना निमंत्रण देताय

या करारामुळे, Airtel आणि SpaceX एअरटेलच्या रिटेल स्टोअर्समध्ये स्टारलिंक उपकरणे, Airtel द्वारे व्यावसायिक ग्राहकांना स्टारलिंक सेवा, शाळा आणि आरोग्य केंद्रांशी जोडण्यासाठी आणि भारतातील अगदी दुर्गम ग्रामीण भागातही सेवा पुरवण्यासाठी मदत होणार आहे.

एअरटेल आणि स्पेसएक्स स्टारलिंक एअरटेल नेटवर्कचा अधिक विस्तार कसा करू शकतात याचा देखील विचार केला जाईल.

काय आहे स्टारलिंक? (What Is Starlink)

पारंपारिक उपग्रह प्रदाते सहसा स्पीड (वेग) आणि लोडिंग (विलंब) अशा समस्यांना तोंड देतात. परंतु स्टारलिंक हजारो लहान उपग्रहांचा ॲरेचा वापर करते यामुळे कमी विलंबासह ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट मिळण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com