9 हजार कोटींचा हिशोब लागेना! BYJU's ला ईडीची नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ED: मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये देशाबाहेर पाठवलेल्या आगाऊ पैशाच्या संदर्भात आयात दस्तऐवज सादर करण्यात अयशस्वी झाल्याच्या आरोपाचाही समावेश आहे.
CEO and co-founder Ravindran Byju of BYJU's.
CEO and co-founder Ravindran Byju of BYJU's.Dainik Gomantak
Published on
Updated on

ED sent notice to CEO and co-founder Ravindran Byju of BYJU's:

एज्युटेक कंपनी बायजूला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. ईडीने मंगळवारी बायजू आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक रवींद्रन बायजू यांना 9,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

आर्थिक तपास एजन्सी ईडीने बायजू आणि त्याच्या मुख्य प्रवर्तकावर फेमा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केल्याची विविध कारणे दिली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये देशाबाहेर पाठवलेल्या आगाऊ पैशाच्या संदर्भात आयात दस्तऐवज सादर करण्यात अयशस्वी झाल्याच्या आरोपाचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला मिळालेल्या विदेशी थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) तुलनेत निर्यात उत्पन्नाचा तपशील देण्यास कंपनीने विलंब केल्याचा आरोपही ईडीने केला आहे.

ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, बायजू ब्रँड अंतर्गत कार्यरत असलेल्या थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे सह-संस्थापक रवींद्रन यांना परकीय चलन व्यवस्थापनाच्या तरतुदींनुसार 9,362.35 कोटी रुपयांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

भागधारकांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये, कंपनीने कायदेशीर फर्मच्या ऑडिट अहवालाचा हवाला दिला आहे आणि म्हटले आहे की, त्यांनी कोणत्याही FEMA नियमांचे उल्लंघन केले नाही.

CEO and co-founder Ravindran Byju of BYJU's.
Panauti: राहुल गांधींच्या 'पनौती' वक्तव्यावर भाजप संतापला, दिल्ली पोलिसांकडे केली तक्रार

अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले की, एप्रिलमध्ये रवींद्रन यांच्या बेंगळुरू येथील घरासह तीन जागा जप्त करण्यात आल्या होत्या. झडतीनंतर रवींद्रन आणि बायजूचे मुख्य वित्त अधिकारी यांचे जबाब नोंदवण्यात आले.

निवेदनानुसार, थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडला मिळालेल्या विदेशी गुंतवणुकीबद्दल आणि कंपनीच्या 'व्यवसाय आचरणा'बाबत आलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

तक्रारीत असे म्हटले आहे की, कंपनीने भारताबाहेर महत्त्वपूर्ण निधी पाठविण्याबरोबरच परदेशात गुंतवणूक केली आहे जी FEMA कायदा, 1999 च्या तरतुदींचे उल्लंघन करते.

ही बेंगळुरूस्थित कंपनी शालेय शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी आणि इतर सेवा पुरवते. याची स्थापना रवींद्रन बायजू यांनी त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ यांच्यासोबत केली होती.

CEO and co-founder Ravindran Byju of BYJU's.
रामायण-महाभारताचा होणार शालेय अभ्यासक्रमात समावेश, NCERT पॅनेलची शिफारस

ईडीला २०११ ते २०२३ या कालावधीत कंपनीने सुमारे २८ हजार रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मिळाल्याचे आढळून आले.

याबाबत तपास यंत्रणेचे म्हणणे आहे की, या कालावधीत एफडीआयच्या नावाखाली सुमारे 9,754 कोटी रुपये परदेशात पाठवण्यात आले. तर, ईडीचा आरोप आहे की, कंपनीने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावावर सुमारे 944 कोटी रुपये दाखवले होते, परंतु यामध्ये परदेशी अधिकारक्षेत्रात पैसे पाठवण्याचाही समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com