Nirav Modiवर EDची कारवाई, हाँगकाँगमधील 252 कोटींची मालमत्ता जप्त

या सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून जप्त करण्यात आल्या आहेत.
Nirav Modi
Nirav ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Nirav Modi Properties Seized: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी सांगितले की त्यांनी 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, ज्यात हिरे, दागिने आणि फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीशी (Nirav Modi) संबंधित कंपन्यांच्या बँक ठेवींचा समावेश आहे.

Nirav Modi
विजय मल्ल्या, नीरव मोदी अन् मेहुल चोक्सीने बॅंकाचे 18,000 कोटी केले परत !

केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, या सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत आणि मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून जप्त करण्यात आल्या आहेत. निवेदनानुसार, हाँगकाँगमधील नीरव मोदी समूहाच्या काही मालमत्ता खाजगी 'तिजोरी'मध्ये ठेवलेल्या हिरे आणि दागिने म्हणून ओळखल्या गेल्या आहेत. यासोबतच तेथील बँक खात्यांमध्ये किती रक्कम ठेवली आहे, याचीही माहिती मिळाली.

पीएमएलएच्या तरतुदींनुसार जप्त केलेली मालमत्ता

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) तरतुदींनुसार त्याची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे. नीरव सध्या ब्रिटनच्या तुरुंगात कैद आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलर्सच्या फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे.

Nirav Modi
विजय मल्ल्या, नीरव मोदी अन् मेहुल चोक्सी यांची 19,111 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात कैद

50 वर्षीय नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात बंद आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (पीएमएलए) अंतर्गत ECIR नोंदवून 6,498.20 कोटी रुपयांच्या PNB बँकेच्या फसवणूक प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com