रेल्वेच्या गोदामामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कामगार मंत्रालयाने रेल्वे गोडाऊनमध्ये (Railway Godown) कामगारांना मान्यता दिली आहे. यामुळे त्यांना ई -श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी मिळाली आहे. रेल्वे गोदाम कामगारांचे गोदाम कामगार म्हणून वर्गीकरण केले जाते आणि पोर्टलवर रजिस्ट्रेशन व्यवसायाच्या राष्ट्रीय वर्गीकरणावर आधारित आहे. ई -श्रम पोर्टलवरील (E-Shram) यादी नुकतीच सुधारित करण्यात आली आहे. यात सुमारे 400 व्यवसायांचा (Business) समावेश करण्यात आला आहे. ई -श्रम पोर्टलवर 24 कोटींहून अधिक कामगारांचे रजिस्ट्रेशन झाले आहे.
कामगार मंत्रालयाच्या मते, हा पहिला राष्ट्रीय डेटाबेस आहे ज्यामध्ये असंघटित कामगार, गिग प्लॅटफॉर्म कामगार आणि बांधकाम करणाऱ्या कामगारांचा समावेश आहेयात नोंदणीमध्ये, उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे तसेच पश्चिम बंगाल आणि बिहार (Bihar) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. यामुळे असंघटित कामगारांना (Workers) सामाजिक सुरक्षा लाभांचे अधिक चांगले वितरण करण्यात मदत होईल.
'वेअरहाऊस वर्कर्स' व्यवसायात केला बदल:
सध्याच्या यादीत वेअरहाऊस वर्कर हा आधीपासूनच ये व्यवसाय आहे. रेल्वे गोदाम कामगारांच्या सोयीसाठी, गोदाम कामगार या व्यसायात थोडा बदल करण्यात आला आहे आणि तो रेल्वे (Railway) गोदाम कामगार असा बदलण्यात आला आहे. आता गोदाम कामगार या व्यवसायातर्गत नोंदणी करू शकतात.
कामगार प्रवक्ते परिमल कांती मंडल म्हणाले, "व्यक्तीच्या आयुष्यात ओळख ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. भारत (India) सरकारच्या कामगार मंत्रालयाने आमच्या गोदामातील कामगारांना ओळखून त्याच्या जीवनाला एक नवी दिशा दिली आहे. ते म्हणाले, आज रेल्वे गुड्स वेअरहाऊस कामगार युनियनच्या कर्मचाऱ्यांना आशेचा किरण दिसत आहे. आमच्या सर्व मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत, मात्र काही मागण्यांवर मंत्रालयाकडून विचार सुरु आहे. ई -श्रम कार्डचा (E-Shram Card) फायदा घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरवर (Common Sevice Center) जाऊन करू शकता किंवा राज्य सेवा केंद्रावर जाणून नोंदणी करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.