Government Scheme: करा संधीच सोनं! परताव्यातून तुम्हाला होणार लाखोंचा लाभ

पोस्ट ऑफिस अशी योजना आहे ज्यामध्ये अगदी कमी गुंतवणुकीतही तुम्‍ही मोठा फंड बनवू शकता.
Government Scheme
Government SchemeDainik Gomantak

पोस्ट ऑफिस योजनांच्या गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. एक म्हणजे त्यात चांगला परतावा मिळतो. तसेच, या योजना पूर्णपणे सुरक्षित असतात. पोस्ट ऑफिस अशी योजना आहे ज्यामध्ये अगदी कमी गुंतवणुकीतही तुम्‍ही मोठा फंड बनवू शकता.

Government Scheme
SBI ला महिला आयोगाने बजावली नोटीस, '3 महिन्यांची गर्भवती महिला नोकरीसाठी अनफिट'

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Post office Scheme) असे या योजनेचे नाव आहे, ही एक प्रकारची विमा योजना आहे. त्यात तुम्हाला दररोज फक्त 50 रुपये गुंतवावे लागतील (रु. 1500 प्रति महिना) आणि तुम्हाला 35 लाख रुपये मिळू शकतात.

19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ही योजना सुरु करु शकतो.

या योजनेमध्ये किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे.

या व्यतिरिक्त जर आपण जास्तीत जास्त रकमेबद्दल बोललो तर ते 10 लाख रुपयांपर्यत असणार आहे.

Government Scheme
Budget 2022: आंतरराष्ट्रीय मार्केटिंग खर्चात भारतीय उत्पादनांना मिळणार सूट?

प्रीमियमची रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर देखील भरली जाऊ शकते.

प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील आहे.

या योजनेंतर्गत कर्ज घेता येते परंतु पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनीच ही सुविधा तुम्हाला मिळू शकते.

या योजनेत जीवन विम्याचा लाभही तुम्हाला उपलब्ध होतो.

ही पॉलिसी 3 वर्षांनी बंद केली जाऊ शकते.

यामध्ये ग्राहकांना बोनसची सुविधाही मिळते आणि ग्राहकांना 1000 रुपयांमागे 65 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Government Scheme
Budget 2022: ट्रॅव्हल अन् टुरिझम उद्योगाला मोदी सरकार देणार का दिलासा?

तुम्ही ही पॉलिसी इंडिया पोस्टमधून देखील घेऊ शकता.

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असणार आहे.

अशा परिस्थितीत, खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com