USA Tariff: रशियाशी जवळीक पडली महागात? अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, शेअर बाजारात भूकंपाची शक्यता!

America Imposes 25 Percent Tariff On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वीच भारतावर 25 टक्के 'टॅरिफ' (आयात शुल्क) लावला.
Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

America Imposes 25 Percent Tariff On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वीच भारतावर 25 टक्के 'टॅरिफ' (आयात शुल्क) लावला. टॅरिफ लावताना ट्रम्प यांनी भारतासाठी धमकीची भाषाही वापरली. रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे (Friendship with Russia) भारतावर हा टॅरिफ लावण्यात आल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. गेल्या अनेक वर्षांपासून भारत रशियाकडून कच्च्या तेलाची (Crude Oil) आयात करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर हा 25 टक्के टॅरिफ (Penalty) लावला.

रशियासोबतचा व्यापार भारताला महागात पडला

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरु आहे, ज्यामुळे युरोपियन देशांनी (European Countries) रशियावर अनेक निर्बंध (Sanctions) लादले आहेत. युरोपातील देश रशियाकडून कच्चे तेल आणि वायू आयात करत नाहीत. याच कारणामुळे भारत (India) गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे, जे अमेरिका आणि युरोपच्या डोळ्यात खुपत होते. याच कारणामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला.

Donald Trump
Donald Trump: 'आणखी खरतनाक हल्ले केले जातील...', इस्त्रायलच्या कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला खुली धमकी

डोनाल्ड ट्रम्प नेमके काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, "जरी भारत आमचा मित्र असला तरी, अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्यासोबत खूप कमी व्यापार केला आहे. कारण त्यांचे टॅरिफ (आयात शुल्क) खूप जास्त आहेत. त्यांच्याकडे असे कठोर आणि त्रासदायक गैर-आर्थिक व्यापार अडथळे (Non-economic Trade Barriers) आहेत, जे जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा सर्वात कठीण मानले जातात."

ट्रम्प पुढे म्हणाले की, "याशिवाय, भारताने नेहमीच आपल्या बहुतेक लष्करी वस्तू (Military Goods) रशियाकडूनच खरेदी केल्या आहेत आणि चीनसोबत (China) मिळून रशियाकडून सर्वाधिक ऊर्जा (Energy) देखील तोच घेतो. त्यामुळे आता भारताला 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ द्यावा लागेल आणि या कारणांसाठी दंडही लागेल."

Donald Trump
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प Apple CEO टिम कुक यांना सांगतायेत, 'भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही'

शेअर बाजारात 'वादळ' येण्याची शक्यता

ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 25 टक्के टॅरिफचा परिणाम गुरुवारी (31 जुलै) शेअर बाजारात (Share Market) दिसून येऊ शकतो. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, टॅरिफच्या या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि बाजारात मोठी घसरण (Major Decline) पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत शेअर बाजारात तेजी (Uptrend) दिसून आली होती. मात्र आता टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर (Indian Economy) नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com