Mobile Shopping Tips: असे स्वस्त मोबाईल खरेदी केल्यास तुम्हाला 6 महिन्यानंतर होणार पश्चाताप

अनेक कंपन्या कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची ऑफर देत आहेत.
Mobile
MobileDainik Gomantak

Mobile Care Tips: केंद्र सरकारने मोबाईल फोनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व फोन निर्मात्यांना भारतात विकल्या जाणार्‍या सर्व स्मार्टफोनमध्ये एमर्जेंसी अलर्ट फिचर देण्याचे आदेश जारी केले आहेत. जेणेकरून युजर्संना भूकंप, चक्रीवादळ आणि पूर यांसारख्या आपत्तींविषयी वेळेवर माहिती मिळू शकेल. 

सरकारकडून एक योजना तयार केली जात आहे. ज्यामध्ये भूकंपासारख्या आपत्तीच्या घटनेबाबत युजर्संना अलर्ट जारी केला जाईल. सोप्या भाषेत सांगायचे तर, भूकंपामुळे तुमच्या फोनची रिंग होईल. हे युजर्संना आपत्तीबद्दल सतर्क करेल.

  • मोबाईल कंपन्यासाठी नवा नियम

मोबाईल (Mobile) कंपन्या युरोपियन युनियनच्या अनेक देशांमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर प्रदान करतात. भारतातील (India) काही मोबाईल फोनमध्येही हेच आपत्कालीन अलर्ट वैशिष्ट्य दिले आहे. 

पण जेव्हा तुम्ही हे फीचर चालू करता तेव्हा एक मेसेज दिसेल की हे फीचर सध्या भारतीय वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. मात्र आता सरकारने हे फीचर अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत मोबाईल कंपन्यांना सर्व स्मार्टफोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर द्यावे लागणार आहे. 

तसेच जुन्या स्मार्टफोनसाठी सॉफ्टवेअर अपडेट द्यावे लागणार आहे. नाही तर मोबाईल कंपन्या भारतात त्यांचे स्मार्टफोन विकू शकणार नाहीत. सरकारने मोबाईल कंपन्यांना 6 महिन्यांची मुदत दिली आहे.

Mobile
Akshaya Tritiya निमित्त सोनं खरेदी करतांना घ्या काळजी, 'या' पद्धतीने करा सोन्याची पारख
  • हा फोन खरेदी करू नका

1. स्वस्त मोबाईल पाहुन वापरकर्त्यांनी एमर्जन्सी अलर्ट फिचरशिवाय स्मार्टफोन खरेदी करू नये. अन्यथा 6 महिन्यांत तुम्हाला पश्चाताप होईल.

2. भारतासारख्या देशात भूकंप हे नेहमीचेच असतात. स्मार्टफोनमध्ये एमर्जन्सी अलर्ट फीचर असणे आवश्यक आहे.

3. एमर्जन्सी अलर्ट फीचरशिवाय कोणी फोन स्वस्तात विकत असेल तर वापरकर्त्यांनी तो खरेदी करणे टाळावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com