Akshaya Tritiya
Akshaya TritiyaDainik Gomantak

Akshaya Tritiya निमित्त सोनं खरेदी करतांना घ्या काळजी, 'या' पद्धतीने करा सोन्याची पारख

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
Published on

Akshaya Tritiya: यावर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला आणि माता गंगा पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

असे मानले जाते की हा संपूर्ण दिवस शुभ असतो. कोणतेही काम करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहावा लागत नाही. यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने (Gold) खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी खरेदी करतात. परंतु सोन्याची नाणी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Akshaya Tritiya
Summer Skin Care: पिठापासून बनवा परफेक्ट फेस पॅक! चेहरा दिसेल ग्लोइंग
  • तुम्ही कुठून खरेदी करत आहात?

गोल्ड कॉईन खरेदी करताना तुम्ही कुठून खरेदी करत आहात याकडे नक्की लक्ष द्यावे. कारण आजच्या काळात ऑनलाइन आणि ऑफलाईन ज्वेलर्स व्यतिरिक्त, ऑनलाइन अॅप्स प्रमाणेच इतर अनेक ठिकाणी गोल्ड कॉईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामुळे सोन्याचे नाणे खरेदी करतांना योग्य ठिकाणांहुन खरेदी करावी.

  • कॅरेट

सोन्याचे नाणे खरेदी करताना सोने किती कॅरेटचे आहे हे नेहमी लक्षात ठेवा. काहीवेळा ज्वेलर्स सोन्याच्या नाण्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी त्यात जस्त आणि चांदीसारखे धातू घालतात.

  • हॉलमार्क

सोन्याच्या नाण्यावरील हॉलमार्क कधीही चुकवू नका. हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. 1 एप्रिल 2023 नंतर हॉलमार्कशिवाय सोने खरेदी करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

  • सोन्याचे नाणे पॅकेजिंग

सोन्याच्या नाण्यांच्या पॅकेजिंगकडे नेहमी लक्ष द्याहे असे असावे की ते उघडले जाऊ शकत नाही. यामुळे तुमच्यासोबत फसवणूक होण्याचा धोकाही कमी होईल. तसेच सोन्याचे नाणे पुन्हा विकताना तुम्हाला जास्त किंमत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com