Dell Layoff: आता डेल दाखवणार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

Dell Layoff: मिळालेल्या माहितीनुसार, डेल येत्या काळात आपल्या 6650 कर्मचाऱ्यांना काढणार आहे. संपूर्ण जगभरातील डेल कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Dell Layoff
Dell LayoffDainik Gomantak
Published on
Updated on

Dell Layoff 5% of its Workforce: जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. अ‍ॅमॅझोन , गुगल , मोयक्रोसॉफ्ट या कंपन्यानी मागच्या काही महिन्यात अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले आहे. आता यामध्ये डेल चादेखील समावेश झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डेल येत्या काळात आपल्या 6650 कर्मचाऱ्यांना काढणार आहे. संपूर्ण जगभरातील डेल कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीचा ग्लोबलफोर्स 5 टक्के इतका आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टनुसार, कंपनीने सुरुवातीला नवीन कर्मचाऱ्यांची भरती बंद केली. प्रवास करण्यावरदेखील बंदी घातली. आता कंपनी कर्मचाऱ्यांना कंपनीतून कमी करण्यावर लक्ष देत आहे. 2020 मध्येदेखील कंपनीने कोरोनामुळे कित्येक कर्मचाऱ्यांना कमी केले होते.

Dell Layoff
WhatsApp Trick: व्हॉट्सअॅपमध्ये पासवर्डशिवाय कोणीही पाहू शकणार नाही फोटो, जाणून घ्या सोपी ट्रिक

रिपोर्टमध्ये कंपनीतील कोणत्या टीमवर यांचा परिणाम होणार आहे हे सांगण्यात आले नाही. मार्च 2022 मधील एका रिपोर्टनुसार, कंपनीचे एक तृतीआंश कर्मचारी अमेरिके( USA )त राहतात. डेल हा पीसी मधील ब्रॅंड आहे. मात्र सध्या डेलसुद्धा आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

दरम्यान, पीसी ब्रॅंड एचपीने 2022 च्या नोव्हेंबर मध्ये 2025 पर्यत कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली होती. कंपनी( Company ) किमान 6000 कर्मचाऱ्यांना ले ऑफ करण्याचा प्लान करत असल्याची माहिती समोर आली आहे. एचपीचा ग्लोबल वर्कफोर्स 12 टक्के आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com