WhatsApp Trick
WhatsApp TrickDainik Gomantak

WhatsApp Trick: व्हॉट्सअॅपमध्ये पासवर्डशिवाय कोणीही पाहू शकणार नाही फोटो, जाणून घ्या सोपी ट्रिक

व्हॉट्सअॅपमध्ये लोकांना पासवर्ड प्रोटेक्टेड फोटो पाठवता येणार आहे.
Published on

व्हॉट्सअॅप हे एक लोकप्रिय मॅसेजिंग अॅप आहे. कंपनी यूजर्ससाठी नवनव फीचर्स घेउन येत असते. यावेळी व्हॉट्सअॅप आणखी एक नवे फिचर घेउन आले आहे. यामध्ये लोकांना पासवर्ड प्रोटेक्टेड फोटो पाठवता येणार आहे. पण हे फिचर ऑफिशियल नाही. यासाठी तुम्हाला एका ट्रिकची मदत घ्यावी लागेल.

WhatsApp Trick:
WhatsApp Trick: Dainik Gomantak

याच्या मदतीने तुम्ही WhatsApp वर कोणालाही पासवर्ड प्रोटेक्टेड फोटो पाठवू शकता. फोटो ओपन करण्यासाठी, परिसिवरकडे पासवर्ड असणे आवश्यक आहे. त्याची ट्रिक अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये फोटो पाठवावा लागेल.

WhatsApp Trick:
WhatsApp Trick: Dainik Gomantak

सर्वात पहिले तुम्हाला Google Play Store वरून IMG2PDF अॅप डाउनलोड करावे लागेल. ते इंस्टॉल केल्यानंतर ते लाँच करा. यानंतर तुम्हाला + बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्टेड करायची असलेली इमेज सिलेक्ट करा.

WhatsApp Trick:
WhatsApp Trick: Dainik Gomantak

यानंतर पीडीएफ तयार करा बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्शन बॉक्सवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला Enter PDF Filename च्या पुढे फाइलचे नाव टाकावे लागेल. यानंतर पीडीएफ पासवर्डच्या समोर पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर OK बटणावर क्लिक करा. तुमची फाईल तयार होईल.

WhatsApp Trick:
WhatsApp Trick: Dainik Gomantak

तुम्हाला या फाईलच्या शेजारी असलेल्या शेअर बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप सिलेक्ट करावे लागेल. आता व्हॉट्सअॅप ओपन होईल. तुम्हाला तो संपर्क निवडावा लागेल ज्याला तुम्हाला इमेज पाठवायची आहे. त्यानंतर सेंड बटणावर क्लिक करा.

WhatsApp Trick:
WhatsApp Trick: Dainik Gomantak

हा फोटो ओपन करण्यासाठी रिसीवरला पासवर्ड माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही वरील स्टेपमध्ये जो पासवर्ड केलेला आहे तो पासवर्ड रिसीव्हरसोबत शेअर करा. तो फोटो कोणत्याही पीडीएफ रीडर अॅपने उघडता येते.

WhatsApp Trick:
WhatsApp Trick: Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com