
Delhi-Meerut RRTS Rapid Rail: दिल्ली-मेरठ रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टम हे भारतातील पहिले हायस्पीड रॅपिड रेल्वे शहरी नेटवर्क असेल. निर्माणाधीन रेल्वे मार्ग दिल्लीपासून सुरु होईल आणि गाझियाबाद, मोदीनगर आणि मुझफ्फरनगर मार्गे उत्तर प्रदेशातील मेरठला जोडेल. RRTS कॉरिडॉरसाठी NCRTC द्वारे तैनात करण्यात येणारी आधुनिक ट्रेनसेट 180 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे.
दरम्यान, आता ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतातील (India) पहिली वेगवान रीजनल ट्रेन एका निर्माणाधीन आरआरटीएस ट्रेन स्टेशनवरुन ताशी 150 किमी वेगाने जात असल्याची दिसत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन असेल.
तसेच, वंदे भारत एक्स्प्रेस देखील 180 किमी प्रतितास वेगासाठी डिझाइन करण्यात आली आहे. परंतु रेल्वे ट्रॅकवरील सुरक्षा मर्यादांमुळे वंदे भारत गाड्यांचा वेग फक्त 130 किमी प्रतितास इतका मर्यादित होतो.
दुसरीकडे, आरआरटीएस हा उन्नत रेल्वे मार्ग असेल. ज्यामध्ये सार्वजनिक हस्तक्षेप होणार नाही आणि त्यामुळे कोणत्याही समस्येशिवाय ती 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने धावू शकते.
अहवालानुसार, ट्रेनचा वेग 150-160 किमी प्रतितास आहे. RRTS ट्रेन या भारतातील सर्वात वेगवान मेट्रो ट्रेन आहेत. विशेष म्हणजे, ती पहिली रीजनल जलद रेल्वे देखील असेल. 2025 पर्यंत संपूर्ण दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गाझियाबाद, उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) दुहाई-साहिबाबाद विभाग 2023 च्या सुरुवातीला सुरु होण्याची अपेक्षा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.