Mahindra Car Delivery: 2099 मध्ये महिंद्रा देणार 'ही' कार, ग्राहकाला पाहावी लागणार 76 वर्षे वाट !

Budget Cars Under 15 Lakh: तुम्ही कार खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा, बुकिंग केल्यानंतर तुम्हाला शोरुममध्ये डिलिव्हरीची तारीख दिली जाते.
Mahindra Car Booking Slip
Mahindra Car Booking Slip Dainik Gomantak
Published on
Updated on

Budget Cars Under 15 Lakh: तुम्ही कार खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा, बुकिंग केल्यानंतर तुम्हाला शोरुममध्ये डिलिव्हरीची तारीख दिली जाते. काही वेळा प्रतीक्षा कालावधीही मोठा होतो. काही कारसाठी प्रतीक्षा कालावधी 6 महिने किंवा एक वर्षांपर्यंत असतो. त्यामुळे तुम्हीही वाट पाहू शकता. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की, कार बुक केल्यावर 76 वर्षांनंतर ग्राहकाला डिलिव्हरी मिळते, तर हे ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. पण ते खरे आहे. महिंद्रा XUV700 कार बुक केल्यावर एका ग्राहकाला 2099 ची तात्पुरती डिलिव्हरी तारीख मिळाली आहे.

सत्य काय आहे

दरम्यान, ग्राहकाला (Customer) महिंद्रा XUV700 कारची डिलिव्हरी सप्टेंबर 2099 मध्ये मिळेल. वास्तविक, टायपिंगच्या गोंधळामुळे स्लिपमध्ये ही चूक झाली. ही चूक सप्टेंबरमध्ये म्हणजेच वर्षाच्या 9व्या महिन्यात घडली. ज्यांनी ही कार सप्टेंबरमध्ये बुक केली, त्यांना 9-SEP-99 ची पावती मिळाली. प्रतीक्षा कालावधी 2 वर्षांचा असला तरी.

Mahindra Car Booking Slip
Anand Mahindra यांनी ट्विटरवर दिली कबुली! 'मला या कथेबद्दल...'

नवीन वेरिएंट लाँच

महिंद्राची XUV700 ग्राहकांना खूप आवडते. त्याचे नवीन ई-वेरिएंटही लाँच करण्यात आले आहे. कंपनीने त्यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) देखील दिले आहे. जर एखाद्याला 5 स्टार ग्लोबल NCAP रेटिंग हवे असेल, तर हे फीचर त्याच्यासाठी अनिवार्य आहे. महिंद्राने XUV700 च्या AX3, MX आणि AX5 पेट्रोल (Petrol) मॅन्युअल व्हेरियंटमध्ये E वेरिएंट दिले आहेत. त्याची किंमत रेग्युलर वेरिएंटपेक्षा 50 हजार रुपये जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com