Anand Mahindra यांनी ट्विटरवर दिली कबुली! 'मला या कथेबद्दल...'

Anand Mahindra Confession: आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप सक्रिय असतात.
 Anand Mahindra
Anand MahindraDainik Gomantak
Published on
Updated on

Unsung Heroes Of Indian History: आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांशी बोलणे असो किंवा कोणताही प्रेरक व्हिडिओ शेअर करणे असो, आनंद महिंद्रा लोकांना प्रेरणा देण्याची कोणतीही संधी सोडत नाही. यावेळीही महिंद्रा यांनी असाच एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी मागितली माफी!

महिंद्रा या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहितात- मी कबूल करतो की, मला या अद्भुत कहाणीबद्दल माहिती नव्हते. अशी माहिती मिळवणे हा बालदिन आणि नेहरु जयंती साजरी करण्याचा योग्य मार्ग आहे. या ट्विटमध्ये एका मुलाबद्दल सांगण्यात आले आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित माहितीही नसेल. प्रथम तुम्ही आनंद महिंद्रा यांचे ट्विट (व्हायरल) पाहा...

 Anand Mahindra
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली खऱ्या फुन्सुक वांगडूंची भेट

लोकांना अद्भुत कथा सांगितली

महिंद्रा यांनी रिट्विट केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, 'दिल्लीच्या हरीशचंद्र मेहरा यांनी आपले शौर्य आणि कुशाग्र बुद्धीचा वापर करुन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांचे प्राण वाचवले. या मुलामुळेच सरकारला (Government) शौर्य पुरस्कार सुरु करण्याचा मार्ग मिळाला. त्यावेळी या मुलाचे वय फक्त 14 वर्षे होते.'

 Anand Mahindra
ती 'जीप' रस्त्यावर चालवू देणार नाही, बदल्यात बोलेरो देईन; आनंद महिंद्रा

महिंद्रांचे हे ट्विट व्हायरल झाले

आनंद महिंद्रांच्या (Anand Mahindra) या ट्विटलाही बाकीच्या ट्विटप्रमाणेच बरीच हेडलाईन्स मिळत आहेत. भारताच्या पहिल्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्याबद्दल माहिती असणारे फार कमी लोक आहेत. पण महिंद्रांच्या या ट्विटमुळे लोकांना या अनसंग हिरोची माहिती झाली. या ट्विटला हजारो लोकांनी (Social Media Users) लाईक केले आहे. तर अनेकांनी शेअरही केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com