पुन्हा एकदा बिटकॉइन 30,000 च्या खाली, जाणून घ्या इतर करन्सीचा मार्केट रेट

बिटकॉइनमध्ये 24 तासांत 3 टक्क्यांची घसरण
Cryptocurrency
Cryptocurrency Dainik Gomantak
Published on
Updated on

क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये कमजोरी दिसून येत आहे. मागील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये 31,000 च्या वर व्यापार केल्यानंतर, बिटकॉइन पुन्हा एकदा 30000 च्या खाली घसरला आहे. जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये गेल्या 24 तासांत 3 टक्क्यांची घसरण झाली आहे आणि शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास 29,623.79 वर दिसले. (Cryptocurrency prices today Bitcoin)

लक्षणीय बाब म्हणजे, बिटकॉइनमध्ये या वर्षी आतापर्यंत 35 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे आणि गेल्या वर्षीच्या 69,000 च्या शिखराच्या खाली व्यापार करत आहे. जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजाराचे भांडवलीकरण आज 1.27 ट्रिलियन इतके आहे. गेल्या 24 तासांत त्यात 3.8 टक्क्यांनी घट झाली आहे.

Cryptocurrency
WhatsApp ची अद्भूत ट्रिक, स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असतानाही पाठवा मॅसेज

जर आपण इतर क्रिप्टोकरन्सी पाहिल्या तर, इथरमध्ये शनिवारी 4 टक्क्यांची घसरण झाली आहे आणि ती 1,758.84 च्या पातळीवर दिसली आहे. त्याचप्रमाणे, Dogecoin 0.080677 च्या स्तरावर 2.8 टक्क्यांनी खाली दिसत आहे. शिबा इनू 0.0001069 वर 4 टक्के खाली आहे. त्याच वेळी, सोलाना 36.33 वर 12 टक्क्यांनी खाली आहे.

Cryptocurrency
Indian Tea Return: गव्हा नंतर या देशाने भारताचा चहाही केला परत

दरम्यान, फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने शुक्रवारी आपल्या अहवालात म्हटले आहे की 2021 पासून 46,000 हून अधिक लोकांनी क्रिप्टोकरन्सी-संबंधित फसवणुकीत 1 अब्ज पेक्षा जास्त गमावले आहे. या FTC अहवालात असेही म्हटले आहे की या प्रकारच्या फसवणुकीचे अर्ध्याहून अधिक बळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहिराती आणि संदेशांद्वारे अडकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com